सराईत गुन्हेगाराकडून देशी पिस्टल जप्त
By admin | Published: June 28, 2017 04:10 AM2017-06-28T04:10:31+5:302017-06-28T04:10:31+5:30
खुनाच्या आरोपातील सराईत गुन्हेगाराला अटक करून देशी बनावटीचे एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे त्याच्याकडून जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकी : खुनाच्या आरोपातील सराईत गुन्हेगाराला अटक करून देशी बनावटीचे एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे त्याच्याकडून जप्त करण्यात आली. युनिट १ च्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली.
अजित अनिल सातकर ( वय २४, रा. मु.पो.कान्हे आंबेवाडी, ता. वडगाव मावळ,जि.पुणे) असे पकडण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहायक पोलीस फौजदार संभाजी भोईटे, रवींद्र कदम, कैलास गिरी, पोलीस हवालदार उमेश काटे, पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड, मोहन येलपेले, प्रकाश लोखंडे, मेहबूब मोकाशी, रिजवान जिनेडी, अशोक माने, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, सुधाकर माने, तुषार खडके, सुभाष पिंगळे यांनी केली आहे.
चोरी करणाऱ्यांना अटक
पुणे : बसप्रवासात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधील ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख रुपये किमतीचे ७२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. त्यांची
रवानगी पोलीस कोठडीत
केली आहे.
याप्रकरणात त्यांच्या एका साथीदाराला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, अन्य २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत ऊर्फ परश्या अनिल पवार (वय २७), संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव (वय २८, दोघेही रा. सर्वोदय कॉलनी, मलम्मा निवास, मुंढवा) अशी कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. सनी पॉल, आकाश ऊर्फ गज्जी (दोघेही रा. मुंढवा) यांंच्यावर गुन्हा दाखल
झाला आहे.
याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना २० जून रोजी मुंढवा परिसरात घडली. गुन्ह्यातील चोरीला गेलेला मोबाईल जप्त करायचा आहे. त्यांच्या इतर २ साथीदारांना अटक करायची असल्याने सहायक सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची केलेली विनंती न्यायालयाने ग्राह्य धरली.