शिवसेनेत संघटनात्मक बदल होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:20 AM2017-09-02T01:20:00+5:302017-09-02T01:20:10+5:30
मुंबई येथे मागील आठवड्यात झालेल्या शिवसेना पदाधिकाºयांच्या बैठकीत संघटनात्मक बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतर विधान परिषदेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आयुक्तांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
पिंपरी : मुंबई येथे मागील आठवड्यात झालेल्या शिवसेना पदाधिकाºयांच्या बैठकीत संघटनात्मक बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतर विधान परिषदेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आयुक्तांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. संपर्कप्रमुखांच्या जागी त्यांची वर्णी लागेल, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र, या शक्यतेवर त्यांनी बोलण्याचे टाळले.
महापालिका निवडणुकीत आलेले अपयश आणि २०१९ मधील लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेची बैठक झाली होती. त्यात संघटनात्मक बदलाचे संकेत शिवसेनाप्रमुखांनी दिले होते. संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षाच्या कामास वेळ मिळत नसल्याने कार्यमुक्त केले आहे. तसेच अन्य पदाधिकारी बदलण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. महापालिका पोटनिवडणुकीच्या वेळी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी संपर्कनेते कलावंत असल्याने त्यांना पक्षाचे काम करण्यास वेळ कमी मिळतो.
पूर्णवेळ कार्य करणारा नेता द्यावा, संपर्क नेते बदलावेत, अशी मागणी केली. त्या वेळी मागणी करणाºयांवरच कारवाई केली होती. महापालिका निवडणुकीतही शिवसेनेला मोठे अपयश आले. दरम्यान, अचानक शुक्रवारी डॉ. गोºहे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी शहरप्रमुख राहुल कलाटे उपस्थित होते.
आयुक्तांना केल्या सूचना
डॉ. गोºहे यांनी आयुक्तांची शहरातील प्रश्नांवर चर्चा केली. त्यामुळे संपर्कप्रमुखपदी त्यांच्या नावाची वर्णी लागणार, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. माझ्याकडे राज्याची जबाबदारी आहे, याबाबत मी काहीच बोलू शकत नाही, असे सांगून डॉ. गोºहे यांनी या प्रश्नावर बोलण्याचे टाळले.