सुरक्षारक्षक समाजाचा अविभाज्य घटक - नम्रता पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:59 AM2018-10-03T00:59:54+5:302018-10-03T01:00:09+5:30

नम्रता पाटील : वाकड पोलीस ठाण्याच्या वतीने सुरक्षेचे धडे

Indigenous constituents of the security community - Namrata Patil | सुरक्षारक्षक समाजाचा अविभाज्य घटक - नम्रता पाटील

सुरक्षारक्षक समाजाचा अविभाज्य घटक - नम्रता पाटील

googlenewsNext

वाकड : सुरक्षारक्षकाने चाणक्ष नजर, चपळपणा आणि स्मार्ट वर्क करीत थोडे सजग राहणे आवश्यक आहे़ त्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध बसेल़ मी जरी पोलीस म्हणून समाजाची रक्षा करीत असले तरी माझ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी मला सुरक्षारक्षकांवरच अलंबून राहवे लागते. त्यामुळे प्रत्येक जण कुठे ना कुठे सुरक्षारक्षकांमुळे सुरक्षित असल्याने सुरक्षारक्षक समाजाचा अविभाज्य घटक आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी ताथवडे येथे केले.

वाकड पोलीस ठाण्याच्या वतीने निवासी सोसायटी-कंपनीमधील खासगी सुरक्षारक्षक यांच्यासाठी मालमत्ता सुरक्षा, आग, लिफ्ट अपघात प्रसंगी तातडीने करावयाची उपाययोजना याबाबत बालाजी सोसायटीत मार्गदर्शन शिबिर झाले. या वेळी त्या बोलत होत्या. या शिबिराला सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, अग्निशमन विभागाचे ऋषिकांत चिपाडे, बिजू पिल्ले, प्रमुख वक्ते व गुन्हे प्रतिबंध तज्ज्ञ शरद श्रीवास्तव, ओटीजचे रॉनी चौधरी, संतोष शर्मा, सुदेश राजे, अरुण देशमुख, किरण वडगामा, शिवाजी कटके, बाळासाहेब कलाटे यांच्यासह वाकड व हिंजवडी परिसरातील सोसायटीचे चेरमन, सेक्रेटरी आणि विविध एजन्सीत काम करणारे सुमारे चारशे सुरक्षारक्षक उपस्थित होते.
पाटील म्हणाल्या,‘‘सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षकांना आपली खासगी आणि व्यक्तिगत कामे सांगू नयेत़ त्याला स्वाभिमानाची वागणूक द्यावी़’’
शरद श्रीवास्तव यांनी आधुनिक सुरक्षा व्यवस्था तसेच गुन्हे घडू नये यासाठी घ्यावयाची खबरदारी, यांच्याबाबत नियम, कायदे याबाबत मार्गदर्शन केले़ ऋषिकांत चिपाडे यांनी आग लागल्यानंतर सुरक्षारक्षक म्हणून करावयाची कृती व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले.

Web Title: Indigenous constituents of the security community - Namrata Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.