इंद्रायणी होणार जलपर्णीमुक्त
By admin | Published: May 27, 2017 01:14 AM2017-05-27T01:14:04+5:302017-05-27T01:14:04+5:30
इंद्रायणीत जलपर्णी हटविण्यासाठी प्रशासनाकडून फारसे शास्त्रीय प्रयत्नही केले जात नसल्याची स्थिती वारंवार समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : इंद्रायणीत जलपर्णी हटविण्यासाठी प्रशासनाकडून फारसे शास्त्रीय प्रयत्नही केले जात नसल्याची स्थिती वारंवार समोर आली आहे. त्यामुळे ही समस्या मागील काही वर्षांत बिकट झाली होती. पुराच्या काळात जलपर्णी वाहून गेल्यावरच इंद्रायणी नदीला मुक्ती मिळत असल्याचे प्रत्येक वर्षीचे चित्र यंदा मात्र बदलले आहे.इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी एक मशिन गेल्या दोन दिवसांपासून नदीच्या पात्रात उतरविले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीकरांचे पाप इंद्रायणीत अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आतापर्यंत जलपर्णी वाहून जाण्यासाठी इंद्रायणी नदीकाठावरील नागरिक प्रत्येक
वर्षी पाऊस आणि पुराच्या प्रतीक्षेची गरज असते.
यंदा मात्र पिंपरी-चिचंवड महापालिकेच्या वतीने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशी, कुरूळी हद्दीत पुलाच्या परिसरातील इंद्रायणी नदीतील जलपर्णी हटविण्याचे काम पावसाळ््यापूर्वी हाती घेतले आहे.