औद्योगिक सुरक्षा कार्यालयच झाले असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:28 AM2018-01-17T05:28:48+5:302018-01-17T05:28:52+5:30
मुंबई व राज्यातील विविध शहरांत आगीच्या घटना घडल्यानंतर शासनाने फायर आॅडिट करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, महाराष्ट्र कामगार मंडळाच्या चिंचवड
स्वप्निल हजारे
पिंपरी : मुंबई व राज्यातील विविध शहरांत आगीच्या घटना घडल्यानंतर शासनाने फायर आॅडिट करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, महाराष्ट्र कामगार मंडळाच्या चिंचवड (संभाजीनगर) येथील कार्यालयाच्या बांधकामाला पूर्णत्वाचा दाखला नाही. तसेच, फायर प्रतिबंधक व्यवस्था निकामी आहे. या असुरक्षित इमारतीत औद्योगिक सुरक्षा विभागाचे कार्यालय भाडेतत्त्वावर सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड ही उद्योग व कामगारनगरी आहे. या ठिकाणी एमआयडीसीमुळे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाने चिंचवड येथे कार्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ही इमारत उभारून अनेक वर्षे झाली. मात्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेता दोन वर्षांपासून इमारतीचा वापर सुरू आहे.
शासकीय कार्यालयांना अग्निशामक यंत्रणा सक्तीची असताना ती अपूर्ण अवस्थेत उभारलेली आहे. या इमारतीमध्ये कामगारवर्ग कुटुंबीयांसह अनेकदा येतो. मात्र, त्यांची सुरक्षा वाºयावर आहे. त्यात भर म्हणून महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय या इमारतीत सुरू करण्यात आले आहे.
सुरक्षा विभागाच्या कार्यालयाकडून शहरातील व औद्योगिक कारखान्यांची सुरक्षेचे आॅडिट केले जाते. जर सुरक्षा विभागाचे कार्यालयच फायर आॅडिट न झालेल्या असुरक्षित इमारतीत असेल, तर ते इतर कारखाने, उद्योग व कार्यालयाचीतपासणी कशी काय करू शकतील, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते बाबूराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
या इमारतीत मंडळाचे
विविध कार्यक्रम, योग वर्ग, महिला शिवण यंत्रवर्ग, बालवाडीला येणारी लहान मुले, अभ्यासिकेत येणारे विद्यार्थी व विविध योजनांच्या कामाकरिता येणारे कामगार व कुटुंबीय यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.