धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलं अर्भक, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 11:30 AM2020-10-28T11:30:44+5:302020-10-28T11:40:02+5:30
Pimpari News : कचऱ्याच्या ढिगातील हे अर्भक आरोग्य कर्मचारी नितीन सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आले.
पिंपरी : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दोन तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे जीवंत अर्भक आढळले. काळेवाडीतील राजवाडेनगर, तापकीर मळा चौक येथे बुधवारी (दि. २८) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अर्भकाच्या माता-पित्यांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.
कचऱ्याच्या ढिगातील हे अर्भक आरोग्य कर्मचारी नितीन सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आले. काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नढे, इरफान शेख, रोहित कदम, आरोग्य निरीक्षक वाटाडे यांनी त्यास पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात दाखल केले. अर्भकाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडील यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.