ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:02 AM2018-10-04T02:02:13+5:302018-10-04T02:02:33+5:30

उपाययोजनेची मागणी : पीक जाऊ लागले वाया; एकात्मिक कीड व्यवस्थापनाची गरज

Infernal growth on sugarcane crop | ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव

ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव

googlenewsNext

मोशी : पिंपरी-चिंचवड शहरात झपाट्याने नागरीकरण होत असले तरी मोशी आणि परिसरात बहुतांशी नागरिक अद्यापही शेतीवर अवलंबून आहेत. काही नागरिकांनी खेड तालुक्यात शेती व्यवसाय सुरू केला आहे. अशा शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला आहे. मात्र, हुमणी किड्याच्या प्रादुर्भावामुळे उसाला फटका बसत आहे. उसाचे पीक वाया जाण्याची शक्यता आहे. परिणामी या भागातील शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

मोशी परिसरासह खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहुळ, सिद्धेगव्हाण, चिंचोशी, दौंडकरवाडी, रामनगर, साबळेवाडी आदी गावांमधील ऊस पिकावर हुमणी रोगाचा (कीड) प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे परिसरातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या पदाधिकाºयांनी खेड तहसीलदार, तालुका कृषी विभाग; तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लेखी निवेदन देऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. मात्र, कृषी विभागाकडून पंचनामे करण्यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या नसल्याने ऊस उत्पादक शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. खेडच्या पूर्व भागातील बहितांशी गावांमध्ये चासकमान धरणातून डाव्या कालव्यामार्फत पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. परिणामी परिसरात ऊस पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे पिकाचे क्षेत्रही वाढले आहे. सध्या ऊस पीक आठ महिन्यांचा झाला असून सात ते आठ कांड्यावर आला आहे. पावसाळ्यात ओलाव्यामुळे पिकाची कमी कालावधीत वाढ होण्यास मदत होते. अशातच डोंगराळ आणि माळ रानातील लागवडयुक्त ऊस पिकावर हुमणी अळीने आक्रमक केले आहे. उस उत्पादक शेतकºयांना तारण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी अनुदानासह पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शासकीय पातळीवरून उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. हुमणी किडीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

ऊस पिकाच्या मुळावरच हल्ला
हुमणी अळी ऊस पिकाच्या मुळावर हल्ला करून त्यास निकामी करत आहे. त्यामुळे उसाची वाढ खुंटून उभे पीक जळून जाऊ लागले आहे. बहुळ, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण परिसरात हुमनी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांचे ५० टक्के नुकसान घडून आले आहे. तर बहुळ येथील माणिक साबळे यांचे ७० टक्के पीक किडीने वाया गेले आहे.
हुमनी किडीचा शेतकºयांच्या उत्पादन व उत्पन्नावर
थेट परिणाम होणार आहे. दरम्यान बहुळ येथे कृषी सहायक मंगेश किर्वे व कांबळे यांनी नुकसान झालेल्या माणिक साबळे यांच्या शेतातील ऊस पिकाची पाहणी केली. मात्र अद्यापही पंचनामे प्रतीक्षेत आहेत.
कृषी विभागाने किडीचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ एकात्मिक कीड व्यवस्थापनाची उपाययोजना करावी तसेच हुमणीग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष साबळे, सचिव माणिक साबळे, नवनाथ गिलबिले, सुधाकर साबळे, सचिन लोखंडे आदींसह ऊस उत्पादक शेतकºयांकडून केली जात आहे.
 

Web Title: Infernal growth on sugarcane crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.