शिक्षण मंडळ कारभाराची चौकशी करा

By admin | Published: August 25, 2015 04:54 AM2015-08-25T04:54:56+5:302015-08-25T04:54:56+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळातील गैरकारभाराबाबत राज्य सरकार आणि शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी झाल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करावी

Inquire into the education board | शिक्षण मंडळ कारभाराची चौकशी करा

शिक्षण मंडळ कारभाराची चौकशी करा

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळातील गैरकारभाराबाबत राज्य सरकार आणि शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी झाल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करावी, असे आदेश राज्य शिक्षण मंडळ व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांनी पुणे विभागाच्या शिक्षण आयुक्तांना नुकतेच दिले आहेत.
महापालिकेच्या शिक्षण मंडळातील शालेय साहित्य खरेदीवरून ठेकेदार प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांत गेल्या अनेक महिन्यांपासून जुंपली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट वस्तू दिल्या जात असून, खरेदीप्रकरणात गैरव्यवहार झाला आहे. नियमबाह्य खरेदी रोखावी, याबाबत काही संस्थांनी प्रधान सचिवांकडे मागणी केली होती. याची दखल शासनाने घेतली आहे. ‘साहित्य खरेदीविषयी कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, असा आदेश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी पुण्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर व महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Inquire into the education board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.