शहरातील टुरिस्ट वाहनांची निवडणुकीसाठी तपासणी

By Admin | Published: January 25, 2017 02:06 AM2017-01-25T02:06:22+5:302017-01-25T02:06:22+5:30

पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरी चौकातील सिग्नलपुढे काही अंतरावर पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) काही अधिकारी दबा धरून थांबले होते.

Inspecting the election of Turist vehicles in the city | शहरातील टुरिस्ट वाहनांची निवडणुकीसाठी तपासणी

शहरातील टुरिस्ट वाहनांची निवडणुकीसाठी तपासणी

googlenewsNext

पिंपरी : पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरी चौकातील सिग्नलपुढे काही अंतरावर पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) काही अधिकारी दबा धरून थांबले होते. सिग्नलला पिवळया नंबरप्लेटचे व्यावसायिक वाहन दिसल्यास सतर्कता दाखवून ते थांबवले जात होते. चालकाला थांबवुन त्याच्याकडून वाहनचालविण्याचा परवाना, वाहनाची कागदपत्र याची माहिती घेतली जात होती.
ज्या वाहनचालकांना थांबवले जात होते, त्यांनाही काही लक्षात येत नव्हते. परंतू नंतर त्यांना ही वाहने निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध करून द्यायची आहेत, असे सांगितले. एकूण १७० वाहनांची आवश्यकता आहे, मंगळवारी सायंकाळी सुमारे ६० वाहने अशा पद्धतीने आरटीओ अधिकाऱ्यांनी जमा केली.
रस्ते सुरक्षा अभियान नुकतेच संपले. त्यानंतर अशा पद्धतीने व्यावसायिक वाहने थांबवून बाजुला घेण्यास सांगून कागदपत्रे मागवली जात असल्याने नागरिकही संभ्रमात पडले. चौकात वाहने थांबवली जात असल्याने त्या ठिकाणी गर्दीही जमली. महापालिका निवडणुकीसाठी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांसाठी विविध मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी वाहनांची गरज भासणार आहे. त्यानुसार मोटार वाहन निरिक्षक रघुनाथ कन्हेरकर व अन्य कर्मचारी वर्ग पिंपरी चौकात थांबून अशी वाहने जमा करत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Inspecting the election of Turist vehicles in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.