दिव्यांगाची जे.जे.मुंबई येथे शासन करणार तपासणी
By admin | Published: May 22, 2017 11:42 AM2017-05-22T11:42:16+5:302017-05-22T11:44:17+5:30
शिक्षकांनी खोटे प्रमाणपत्र सादर करुन बदलीतुन सुट मिळविण्याचा प्रयत्न केल्यास सदर शिक्षकांना अपंगाच्या पुर्नतपासणी साठी जे.जे. हॉस्पिटल मुंबई
आनंद कांबळे/ऑनलाइन लोकमत
जुन्नर दि २२ - संपूर्ण राज्यात शिक्षक बदलीचे वारे वाहत आहे. २०१६-१७ मध्ये सर्व साधारण बदलीमधुन सुट मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा सुळसुळाट झाला आहे. जे शिक्षक बोगस प्रमाणपत्र देतील त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.
बदलीमध्ये सूट मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र दिसत आहे.अस्थिव्यंग, अल्पदृष्टी,कर्णबधीर याप्रकारात अपंगाची टक्केवारी वाढवून प्रमाणपत्र सादर करणार्यांची संख्या निश्चितच वाढली आहे. तसेच मेंदू,मणक्याचे आजार याचेही प्रमाण वाढलेले आहे. सदर शिक्षकांनी खोटे प्रमाणपत्र सादर करुन बदलीतुन सुट मिळविण्याचा प्रयत्न केल्यास सदर शिक्षकांना अपंगाच्या पुर्नतपासणी साठी जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.याबाबत मा.आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या श्.उ.मधील स्पष्ट सूचना आहेत.
त्याअनुषंगाने पात्र दिव्यांगावर अन्याय होऊ नये म्हणुन कमी टक्केवारी असणार्या किंवा संशयास्पद प्रमाणपत्र सादर करणार्या शिक्षकांनी याची गांभिर्याने नोंद घ्यावी.मुंबई येथील तपासणीत प्रमाणपत्र बोगस आढळूण आल्यास संबंधित शिक्षकांवर पोलीस कार्यवाही करण्यात येईलअसे शासनाने कडक धोरण घेतले आहे,