मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची खासदार श्रीरंग बारणेंकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 04:44 PM2019-11-04T16:44:45+5:302019-11-04T16:57:33+5:30

तात्काळ पंचनामे करून बाधित सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना..

Inspection by Shrirang Barne of damaged rice farming due to rainfall in Maval area | मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची खासदार श्रीरंग बारणेंकडून पाहणी

मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची खासदार श्रीरंग बारणेंकडून पाहणी

Next
ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे जवळपास अडीच हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य

मावळ :मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली. प्रशासनाने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना बारणे यांनी प्रशासनाला दिल्या.
खासदार श्रीरंग बारणे यांनी अंदर मावळातील टाकवे, माऊ, वडेश्वर या गावतील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी हरीश्चंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी ढगे, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, रोहिदास अस्वले, यशवंत तुरडे, शांतराम लष्करे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. मावळ तालुक्यात यावर्षी 12 हजार हेक्टर जमिनीवर भात शेतीची लागवड झाली आहे. अतिवृष्टीमुळे जवळपास अडीच हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेतीवर अवलंबून आसणा-या शेतक-यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मावळ परिसरात प्रामुख्याने भातशेती केली जाते. मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. या भातशेतीची  बारणे यांनी पाहणी केली. ज्या भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, त्या भागात प्रशासनाने जाऊन तात्काळ पंचनामे करावेत. बाधित झालेल्या सर्व शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी. कोणताही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.
तहसीलदार मधुसूदन बर्गे म्हणाले, "अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य केले जाईल. शासन निर्णयानुसार आर्थिक मदत केली जाईल. संपूर्ण तालुक्यामध्ये भातशेतीच्या झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम चार ते पाच दिवसांपासून सुरू झाले आहे. हे काम पुढील दोन दिवसात पूर्ण करून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अहवाल सादर केला जाणार आहे. सर्व बाधित शेतक-यांना मदत केली जाईल, अशी खात्री देखील त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: Inspection by Shrirang Barne of damaged rice farming due to rainfall in Maval area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.