Online Fraud: लॅपटाॅपऐवजी पार्सलमध्ये निघाल्या २ किलो मिठाच्या पुड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 03:21 PM2022-03-01T15:21:55+5:302022-03-01T15:22:23+5:30
ॲमेझॉन इंडिया या कंपनीकडून ६३ हजार ९९० रुपये किमतीचा लॅपटाॅप मागवला होता
पिंपरी : ऑनलईन मागविलेल्या पार्सलमध्ये लॅपटाॅपऐवजी दोन किलो मिठाच्या पुड्या निघाल्या. वल्लभनगर, पिंपरी येथे १० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला.
डाॅ. जना प्रणित जोशी (वय ४३, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ॲमेझॉन कंपनीतील अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीने ॲमेझॉन इंडिया या कंपनीकडून ६३ हजार ९९० रुपये किमतीचा लॅपटाॅप ऑनलईन खरेदी केला. तो लॅपटाॅप ऑनलईन ऑर्डर केला. त्यानुसार ॲमेझॉन कंपनीच्या डिलिव्हरी एजंटने लॅपटाॅप म्हणून दिलेले पार्सल उघडून पाहिले असता त्यामध्ये लॅपटाॅपऐवजी दोन किलो मिठाच्या पुड्या व खाकी कागद निघाला. आरोपींनी लॅपटाॅपचा अपहार करून फिर्यादी व त्यांच्या व्यक्तीची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे तपास करीत आहेत.