पिंपरी महापालिकेकडून अंगणवाडी सेविकाना विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:57 PM2020-10-09T12:57:20+5:302020-10-09T12:57:49+5:30
माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचा प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुणांशी संपर्क येत आहे.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. त्यातील स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे १ कोटी रुपये रकमेचे सुरक्षा विमा कवच योजनेचा लाभ दिला जावा, असा ठराव स्थायी समिती सभेने मंजूर केला आहे.
कोरोना काळात महापालिकेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना विमा कवच दिले आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचा प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुणांशी संपर्क येत आहे.
............
स्थायी समिती मंजुरी
केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ मिशन अंतर्गत ‘पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज इन्शुरन्स स्किम फॉर हेल्थ वर्कर फाईटींग कोविड -१९’ या योजनेत १ कोटी रुपयांचे सुरक्षा कवच देण्याचा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेने २६ ऑगस्ट २०२० ला मंजूर केला आहे. पालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी, पालिकेकरीता सेवा देणारे कर्मचारी, कंत्राटी, आऊट सोर्सद्वारे घेतलेले कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी, मानधनावरील कामगारांना विमा योजनेच्या लाभ देण्यात येणार आहे.