'शादी डॉट कॉम' वेबसाईटवरून जमवली ओळख; लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 12:41 PM2021-03-16T12:41:43+5:302021-03-16T12:43:24+5:30

आरोपी याने शादी डॉट कॉम या वेबसाइटवरून फिर्यादी अशी ओळख केली.

The introduction on the Shaadi.com website; Rape by showing the lure of marriage | 'शादी डॉट कॉम' वेबसाईटवरून जमवली ओळख; लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

'शादी डॉट कॉम' वेबसाईटवरून जमवली ओळख; लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

googlenewsNext

पिंपरी : शादी डॉट कॉम या वेबसाईटवरून ओळख केली. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केली. तसेच धमकी दिली. तळवडे येथे २०१६ ते १४ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. 

पीडित महिलेने या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १५) फिर्याद दिली आहे. विक्रांत विष्णू स्वाईन (वय ३८, रा. रावेत) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने शादी डॉट कॉम या वेबसाइटवरून फिर्यादी अशी ओळख केली. त्यानंतर फिर्यादीला भेटून लग्नाचे आमिष दाखविले. शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केली. तुला काय करायचे ते कर, अशी धमकी आरोपीने फिर्यादीला दिली. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: The introduction on the Shaadi.com website; Rape by showing the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.