वाहतूक पोलीस शोधताहेत सावज, व्हॉट्सअॅपवरून कारवाईबाबत उलट-सुलट संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:08 AM2018-03-08T03:08:15+5:302018-03-08T03:08:15+5:30
आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस उरले आहेत. मार्च अखेर असल्याने चौका-चौकांत वाहतूक पोलीस दबा धरून बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दक्षता म्हणून वाहन परवाना तसेच अन्य कागदपत्रे जवळ बाळगली तरी काही त्रुटी निघते का? हे पाहून वाहनचालकांकडून सक्तीने दंड वसुली केली जात आहे.
पिंपरी - आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस उरले आहेत. मार्च अखेर असल्याने चौका-चौकांत वाहतूक पोलीस दबा धरून बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दक्षता म्हणून वाहन परवाना तसेच अन्य कागदपत्रे जवळ बाळगली तरी काही त्रुटी निघते का? हे पाहून वाहनचालकांकडून सक्तीने दंड वसुली केली जात आहे. त्यांचे मार्च अखेरचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांना दंडाचा भूर्दंड लादला जात असल्याचे व्हॉट्सअॅप ग्रुपवर मॅसेज व्हायरल झाले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये ठिकठिकाणी कधी नव्हे इतके वाहतूक पोलीस अॅक्टिव्ह झाले आहेत. मार्च सुरू होताच, त्यांची दंड वसुलीची मोहीम अधिक तीव्र झाली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांना दंड झाला पाहिजे, यात कोणाचे दुमत नाही. परंतु वाहनचालक कधी चूक करतोय, त्याला आपण कधी पकडतोय अशा पद्धतीची वाहतूक पोलिसांची कारवाईची मोहीम अन्यायकारक ठरणारी आहे. शहराबाहेरून आलेली एखादी व्यक्ती वाहन घेऊन चुकून नो एंट्रीच्या मार्गावर आल्यास तेथील वाहनचालकाने रस्ता चुकलेल्या वाहनचालकाला कसे जायचे याबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे. एकीकडे पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी आणि मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. बॅरिकेडस लावल्याने शहरात राहणाºया लोकांनाही मार्गात कोठे बदल झाला, हे माहीत नसते, त्यांना माहिती नाही, याचा गैरफायदा उठविला जात आहे.
पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल, एच ए कंपनी जवळील भुयारी मार्ग, मोरवाडी चौक, आुकर्डी, निगडी येथे वाहनचालकांना अडवून विविध कागदपत्रांची तपासणी केली जाते.
रिक्षा : मुदत संपूनही धावताहेत रस्त्यावर
वाहतूक पोलिसांचा हा एक प्रकारे वाहनचालकांना जाच वाटू लागला आहे. परमिट नसलेल्या हजारो रिक्षा शहरात प्रवासी वाहतूक करीत आहेत. अशा रिक्षांवर कारवाई होत नाही. अशा रिक्षांवर कारवाई झाल्यास रिक्षा रस्त्यावर धावूच शकणार नाहीत. परमिट नसलेल्या मुदतबाह्य अशा रिक्षा राजरोसपणे धावत आहेत. खºया अर्थाने कारवाईची मोहीम राबवायची तर अशा अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत़ तसेच पोलिसांच्या एकतर्फी कारवाईबद्दल व्हॉट्सअॅपद्वारे वाहनचालकांचे काही जण प्रबोधन करू लागले आहेत.