पैसे लावा अन् दीडपट नफा मिळवा...! ४८ लाखांना गंडा
By रोशन मोरे | Published: December 4, 2023 04:30 PM2023-12-04T16:30:23+5:302023-12-04T16:30:56+5:30
आरोपींनी दिशाभूल करणारी माहिती देऊन फसवणूक केली
पिंपरी : कंपनीत गुंतवणूक केली तर दीडपट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून व्यावसायिकाची ४८ लाख ५० हजारांची फसवणूक केली. ही घटना २० मे रोजी बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी संतोष ज्ञानेश्वर पिंजण (वय ४५, रा. देहुगाव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रियान शेख ऊर्फ राकेश, सम्राट भाई ऊर्फ सौरभ दुबे, विनय मेहता, आशिक खान ऊर्फ बबलू भाई, सुनील यादव (रा. विश्रांतवाडी, पुणे) यांच्यासह एका महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिलेने फिर्यादी संतोष यांना दिशाभूल करणारी माहिती दिली. तसेच कंपनीचे नाव न सांगता संशयित रियान हा कंपनीचा माणूस असल्याचे सांगितले. कंपनीत गुंतवणूक केल्यास दीडपट परतावा मिळेल असे संशयितांनी फिर्यादी संतोष यांना आमिष दाखवले. त्यासाठी संशयितांनी संतोष यांच्याकडून यांच्याकडू ४९ लाख ५० हजार रुपये घेतले. दरम्यान, त्यातील एक लाख रुपये संशयितांनी संतोष यांना आरटीजीएसद्वारे दिले. उर्वरित ४८ लाख ५० हजार रुपये आणि परतावा न देता संतोष आणि त्यांचा मित्र अफरफ महिरुद्दिन शेख यांची फसवणूक केली.