गतिरोधकांमुळे मिळते अपघाताला निमंत्रण; झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने वाहनचालकांची होतेय कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:49 AM2017-11-12T01:49:55+5:302017-11-12T01:50:16+5:30
आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत.
वाकड : आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत़ अती रहदारीच्या या रस्त्यावर असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकांवर झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहने जंप अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
वाकड राजीव गांधी पुलावरून हिंजवडीकडे जाताना तीव्र उताराच्या वेगाला लगाम लावण्यासाठी पूल संपताच एक गतिरोधक करण्यात आला आहे़ हा गतिरोधक झेब्रा क्रोसिंग नसल्याने दुरून दृष्टी पथास येत नाही. त्यामुळे अनेक वाहने या ठिकाणी जोरात आदळतात़ अनेकदा या समस्येमुळे अपघातही झाले आहेत. मात्र वाहतूक पोलीस संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष अनेकांच्या जिवावर बेतत आहे.
याच रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यास रुंदीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहनाचा वेग आणखीनच वाढतो. मात्र, या वेगाला आवरण्यासाठी बीआरटीने कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत. या रस्त्यावर असलेला एकमेव गतिरोधक म्हणजे अपघाताला पर्वणीच, हा गतिरोधक म्हणजे डांबराचा लांबसडक गोळा त्याला कसलेही रंगाचे गोंदण नसल्याने वाहने जोराने आदळतात. केवळ ग्रामस्थांच्या व काही जागरूक चालकांच्या तसेच वाहतूक पोलिसांच्या मागणीची प्रशासनाने काढलेली ही भाबडी समजूत वाटते. वाकड-हिंजवडीचा कायापालट झालेले असताना काही मोठे हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या सोयीसाठी कुठलाही परवाना न घेता वाहतूक नियमांचा विचार न करता मनमानी पद्धतीने गतिरोधक उभारण्याचे काम करण्याच्याही काही घटना या भागात घडल्या़ मात्र वाहतूक पोलिसांनी असे गतिरोधक हटविले.
थेरगाव, वाकड, हिंजवडी या परिसरातील अंतर्गत रस्त्यावर अनेक लहान गतिरोधक करण्यात आले आहेत़ जिथे गरज नाही अशा ठिकाणी गतिरोधक करून मोठी डोखेदुखी झाली आहे़ गरज नसलेल्या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त गतिरोधक झाल्याने विनाकारण त्रास होत आहे़ त्यावरून जाताना वाहन जोरदार आदळते त्याचा धक्काही शरीराला अपायकारक ठरत आहे.
नियमांचे उल्लंघन : अद्याप पत्रव्यवहारच सुरू
खरे तर वाहतूक नियमांच्या अधीन गतिरोधक उभारण्यासाठी वाहतूक पोलीस गरज असलेल्या ठिकाणचा नकाशा काढून कागदोपत्री त्याची गरज कशी आहे, हे दाखवून संबंधित महापालिका किंवा एमआयडीसी, ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करते. त्यानुसार साडेचार फूट रुंद आणि सहा इंच उंचीचा गतिरोधक उभारण्यात
येतो. मात्र, अनेक ठिकाणी या नियम डावलले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत.
गतिरोधक करण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते़ आमच्या मागणीनुसार किंवा आमच्या पत्रव्यवहारानुसार गतिरोधक केला जातो़ मात्र, अलीकडे फायद्यासाठी अनेक जण बेकायदा गतिरोधक उभारतात, असे बेकायदेशीर गतिरोधक आम्ही स्वखर्चाने हटवितो़
- दत्तात्रेय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग