आयटी कर्मचाऱ्यांच्या 'वर्क फ्रॉम होम' चा घर मालकांना मोठा आर्थिक फटका; भाडेकरू मिळेनात 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:15 PM2020-12-18T14:15:39+5:302020-12-18T14:18:11+5:30

खासगी कंपनीतील ८० कर्मचारी हे भाड्याने राहतात...

IT staff work from home a big financial blow to homeowners | आयटी कर्मचाऱ्यांच्या 'वर्क फ्रॉम होम' चा घर मालकांना मोठा आर्थिक फटका; भाडेकरू मिळेनात 

आयटी कर्मचाऱ्यांच्या 'वर्क फ्रॉम होम' चा घर मालकांना मोठा आर्थिक फटका; भाडेकरू मिळेनात 

Next
ठळक मुद्देबहुतांश कर्मचारी हे शहरातून निघून गेल्याने सर्वच व्यवसायांवर परिणामपुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार अशी शक्यता

पिंपरी : आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम असल्याने देशभरातून नोकरीसाठी आलेले कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. खासगी कंपनीतील ८० कर्मचारी हे भाड्याने राहतात. वर्क फ्रॉम होम असल्याने कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. त्यांनी भाड्यांची घरे सोडली आहेत. त्यामुळे शहरातील घर मालकांना भाडेकरू मि‌‌ळत नसल्याची स्थिती आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. हिंजवडी भागात आयटी कंपन्या आल्यामुळे शहरात देशभरातून चाकरमानी रोजगारासाठी आले. कोरोनामुळे जवळपास ९ महिने झाले वर्क फ्रॉम होम सुरू आहे. याचा मोठा आर्थिक फटका या भागातील उद्योगांवर झाला आहे. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचारी आपल्या मूळ गावातून काम करत आहेत. कोरोनाच्यापूर्वी हिंजवडी आणि परिसरात भाड्याने फ्लॅट मिळणे कठीण होते. मागणी जास्त असल्याने भाडेदेखील वाढले होते. कोरोनामुळे शहरातील बहुतांश फ्लॅट रिकामे झाले आहेत. त्यामुळे आता भाडे कमी झाले आहेत. हिंजवडी भागात अनेकांनी उत्पन्न मिळावे म्हणून फ्लॅट भाड्याने देणे, हॉस्टेल, रूम भाड्याने देणे आदी व्यवसाय कर्ज काढून सुरू केले आहेत. परंतु सध्या भाडेकरू नसल्याने या लोकांचे उत्पन्न थांबले आहे. सर्वच नामांकित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी आवश्यक लागणारे साहित्य दिले आहेत. पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार अशी शक्यता आहे.

---
इतर व्यवसायावर झाला परिणाम

खासगी क्षेत्रात काम करणारे बहुतांश कर्मचारी हे शहरातून निघून गेल्याने सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट, हॉटेल, खासगी कार वाहतूक, हिंजवडी भागातील लहान व्यवसाय, खानावळी आदी व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
--

भाडे झाले कमी
पूर्वी                                          आता

१ बीएचके १२ हजार                 ८ ते ९ हजार
२ बीएचके १५ ते १७ हजार       १२ हजार

--
वर्क फ्रॉम होम असल्याने बहुतांश कर्मचारी गावी गेले आहेत. ८० टक्के कर्मचारी भाड्याने राहत होते. त्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंजवडी भागातील हॉस्टेल्स सध्या रिकामे आहेत. रिअल इस्टेट व्यवसायाला याचा फटका बसला आहे.
- संतोष मांदळे, रिअल इस्टेट एजंट; 

Web Title: IT staff work from home a big financial blow to homeowners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.