आयटीनगरीत सापाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:36 AM2018-10-31T02:36:53+5:302018-10-31T02:37:06+5:30

जगाच्या नकाशावर झळकणारी आयटीनगरी, हिंजवडी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. मात्र या वेळी हिंजवडीची चर्चा झाली ती येथील प्राणिमित्रांनी विषारी मण्यार जातीच्या सापाला जीवदान दिल्याने.

IT veteran survivor | आयटीनगरीत सापाला जीवदान

आयटीनगरीत सापाला जीवदान

Next

वाकड : जगाच्या नकाशावर झळकणारी आयटीनगरी, हिंजवडी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. मात्र या वेळी हिंजवडीची चर्चा झाली ती येथील प्राणिमित्रांनी विषारी मण्यार जातीच्या सापाला जीवदान दिल्याने. हिंजवडीलगतच्या मारुंजी गावात सुधीर बुचडे यांच्या बंगल्याच्या परिसरात बाटलीच्या टोपणात एक साप अडकला असून, सुटकेसाठी धडपडत असल्याचे वाइल्ड अ‍ॅनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीचे संघटक तुषार पवार यांना समजले. तो मण्यार जातीचा अतिविषारी आणि निशाचर सर्प असल्याचे निष्पन्न झाले.

भक्ष्याच्या शोधात असताना तो रात्रीच त्या टोपणात अडकला असावा, असा अंदाज त्यांना आला. सर्पमित्र तुषार पवार, संस्थेचे सचिव शेखर जांभूळकर यांच्याकडे आले. संस्थेचे इतर सदस्य सूरज साखरे, ओंकार भूतकर, कृष्णा पांचाळ यांच्या सहकार्याने सापाची झाकणातून सुखरूप मुक्तता केली. हिंजवडी परिसरात सर्परक्षक म्हणून अध्यक्ष गणेश भूतकर, सचिव शेखर जांभूळकर, संघटक तुषार पवार, प्रकाश काकडे, सुमीत साखरे, उमेश काकडे, अमित साखरे, दीपक कांबळे, श्रीकांत काकडे हे पशू-पक्ष्यांना जीवदान देण्याचे काम सातत्याने करीत आहेत. प्राणिमात्रांवर दया करणे, त्यांना जीवनदान देणे हे आम्हा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. मण्यार हा निशाचर आणि अतिविषारी साप असल्याने त्याची सुटका करणे अत्यंत जोखमीचे काम होते. मात्र, अत्यंत चलाखीने आम्ही त्याला जीवदान देण्यात यशस्वी झालो, असे शेखर जांभूळकर यांनी सांगितले.

या सर्वांनी इलेक्ट्रिक वायरिंगचा पाईप घेऊन त्यात सुरक्षितरीत्या सापाचे मुंडके पाइपमध्ये घातले. त्यानंतर त्याच्या शरीराच्या मधोमध अडकलेले टोपण उपलब्ध साधनांच्या साहाय्याने कापून काढले. कुठे जखम तर नाही ना हे तपासण्यासाठी त्याला मोकळे सोडले असता, तो सुसाट पळाल्याचे पाहून जखमी नसल्याची खात्री करून त्याला जंगलात सोडण्यात आले.

Web Title: IT veteran survivor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.