आयटीयन्सना नियमांचे वावडे, हिंजवडी वाहतूक पोलिसांची कारवाई, तब्बल पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांचा एकूण दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:30 AM2017-12-13T03:30:54+5:302017-12-13T03:31:07+5:30

हिंजवडी, वाकड व ताथवडे परिसरातील आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी वाहतूक विभागाने केवळ ११ महिन्यांत विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, लेन कटिंगच्या ४३१४ वाहनांवर कारवाई केली आहे.

Itinasna Rule of Law, Hinjewadi traffic police action, total penalty of 15 lacs thousand and thousands of recoveries | आयटीयन्सना नियमांचे वावडे, हिंजवडी वाहतूक पोलिसांची कारवाई, तब्बल पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांचा एकूण दंड वसूल

आयटीयन्सना नियमांचे वावडे, हिंजवडी वाहतूक पोलिसांची कारवाई, तब्बल पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांचा एकूण दंड वसूल

Next

- बेलाजी पात्रे

वाकड : हिंजवडी, वाकड व ताथवडे परिसरातील आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी वाहतूक विभागाने केवळ ११ महिन्यांत विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, लेन कटिंगच्या ४३१४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक आयटीयन्सची संख्या असून, तब्बल पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांचा दंड वसूल केला.

शहराच्या विविध भागातून हिंजवडीमधील आयटी कंपन्यांत अभियंते रोज ये -जा करतात. त्यामध्ये दुचाकींवरून प्रवास करणारांची संख्या मोठी आहे. या भागात पर्यायी रस्ता नसल्याने रोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहेत. त्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने कोंडीत भर पडत आहे.
हिंजवडी पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर २०१७ पर्यंत २ हजार २९८ विनाहेल्मेट दुचाकीधारकांवर कारवाई करण्यात आली. तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एवढेच नव्हे, तर याच ११ महिन्यांत सीट बेल्ट न वापरणाºया १३५१ चारचाकी वाहन चालकांवर कारवाई करून २ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर लेन कटिंग करून वाहतूक नियम मोडणाºया २६५ कारवाईत ५३ हजार रुपयांचा दंड जमा झाला. त्यात डिसेंबरमधील कारवाईचा आकडा धरल्यास ही संख्या खूप पुढे जाईल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
रोज दीडशेजणांना दंड
हिंजवडीत सरासरी दररोज १० ते १३ कारवाई केवळ हेल्मेट न घालणाºया वाहनचालकांवर होते. तर सीट बेल्ट, लेन कटिंग, नो पार्किंग, मोबाईल टॉकिंग, कागदपत्रे न बाळगणे, रॉँग साइडने वाहन चालविणे, प्रिंटेड काचा, लायसन्स जवळ न बाळगणे, डी.डी, अवैध प्रवासी वाहतूक, नो एंट्री यासह अन्य अशा सुमारे १४० ते १५०च्या आसपास कारवाई केवळ आयटी पार्कच्या हिंजवडी परिसरात होते. या प्रत्येक वाहतूक नियमांच्या कारवाईसाठी एका कर्मचाºयाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक कारवाई विभागून देण्यात आल्याने एखाद्या कारवाईच्या शेवटपर्यंत सर्व कार्यवाही त्या संबंधित कर्मचाºयाने जबाबदारी पार पडायची, असे नियोजन आहे.

सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस
हिंजवडीत वाहतूक समस्या काही काळापुरती का होईना झाल्यास त्याचे पडसाद सोशल मीडियावर अधिक उमटतात. लगेच ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स अप, इंस्टाग्राम, मेल यावर चर्चेला उधाण येते, तर तक्रारींचा पाऊस पडतो. हिंजवडीतील खास वाहतूक समस्येसाठी काही आयटीयन्स तरुण-तरुणींनी एकत्र येत व्हॉट्स अप, ट्विटरवर ग्रुप तयार केले आहेत. त्यावर मध्यंतरी सह्यांची मोहीमदेखील राबविण्यात आली. तर प्रशासकीय-शासकीय आणि संबंधित मंत्र्यांना देखील ही सर्व मंडळी सोशल मीडियातून जाब विचारतात.

जनजागृतीसाठी पुढाकार
हिंजवडीत सुमारे सव्वाशे आयटी कंपन्या, तसेच इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल व अन्य पकडून १७०० कंपन्या आहेत. यात काम करणारे सुमारे दोन लाख ३० हजार आयटीयन्स आणि इतर कामगार पकडून किमान तीन लाखांच्या वर हा आकडा जातो.
वाहतूककोंडी नित्याची
सुमारे ४० ते ५० टक्के लोक कंपनीच्या कॅब, बस, मेट्रो झिप, सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करतात. मात्र उरलेले किमान ५० टक्के म्हणजेच जवळपास दीड लाख प्रवासी दुचाकी वा कारने प्रवास करतात. त्यामुळे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे.
फ्लेक्सद्वारे जनजागृती
गेल्या आठवड्यापासून हिंजवडी वाहतूक विभाग वाहतूक जनजागृती अभियान राबवत आहे. या अंतर्गत हिंजवडीतील महत्त्वाच्या २५ चौकांत वाहतूक नियम सांगणारे चित्रासह फ्लेक्स लागले असून, यांसह कंपन्यांतून जनजागृती सुरू आहे.

आयटीयन्सनी सहनशीलता ठेवावी
हिंजवडी परिसरात सकाळ-सायंकाळी दोन वेळेस एक बाजूचा रस्ता ओसंडून वाहतो. थोडे फार जॅमिंग झाले, तर लगेच विरुद्ध दिशेने वाहने घातली जातात. तसे न करता थोडी सहनशीलता ठेवावी. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊ लागली आहे. आयटीयन्सनी थोडा धीर व सहनशीलता ठेवल्यास कोंडी कमी होण्यास मदत होईल.
- दत्तात्रय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग हिंजवडी

Web Title: Itinasna Rule of Law, Hinjewadi traffic police action, total penalty of 15 lacs thousand and thousands of recoveries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.