वाहतूक कोंडीतून आयटीयन्सना मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:15 AM2018-09-12T01:15:45+5:302018-09-12T01:15:53+5:30

आयटीनगरीत एकेरी चक्राकार वाहतूक बदलाचा चांगलाच परिणाम जाणवला आहे.

ITIs breathe freely in traffic jams | वाहतूक कोंडीतून आयटीयन्सना मोकळा श्वास

वाहतूक कोंडीतून आयटीयन्सना मोकळा श्वास

Next

हिंजवडी : येथील आयटीनगरीत एकेरी चक्राकार वाहतूक बदलाचा चांगलाच परिणाम जाणवला आहे. सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे त्रस्त असलेल्या आयटी अभियंत्यांना वाहतूक विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे मोकळा श्वास घेणे शक्य झाले आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आयटी अभियंत्यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी हिंजवडी आयटी असोशिएशनच्या (एचआयए) पदाधिकाºयांसोबत मंगळवारी आढावा बैठक घेतली. अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, हिंजवडी विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक निरीक्षक किशोर म्हसवडे, एचआयएचे पदाधिकारी कर्नल भोगल, योगेश जोशी, टीसीएचे सचिन रत्नपारखी उपस्थित होते. आयुक्त पद्मनाभन यांनी ३ सप्टेंबरपासून हिंजवडी, वाकड परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी पाहणी केली. त्यानंतर अभियंते व स्थानिकांशी चर्चा करून एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला. यामुळे काय बदल घडून आला, हे जाणून घेण्याचा आयुक्तांनी प्रयत्न केला. स्थानिक ग्रामस्थ आणि आयटी अभियंत्यांच्या वाहतूक बदलाबाबत आणखी काही सूचना आहेत का, याचीही विचारणा बैठकीत केली.
>आठ दिवसांत जाणवला फरक
हिंजवडीत ३ सप्टेंबरपासून शिवाजी चौक ते विप्रो सर्कल, फेज १, फेज २ या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर चक्राकार एकेरी वाहतूक सुरू केली आहे. जागोजागी असलेले दुभाजक पंक्चर बंद केले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. नागरिकांच्या सूचनांची दखल घेऊन हा तात्पुरता बदल करण्यात आला. हिंजवडीतून वाकडकडे आणि वाकडहून हिंजवडीकडे जाणाºया मार्गावर होणाºया वाहतूककोंडीत आठ दिवसांत बराच फरक जाणवला आहे, अशा प्रतिक्रिया अभियंत्यांनी व्यक्त केल्या. अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे म्हणाले, शहरात हिंजवडी हे देशातील महत्त्वाचे उद्योग केंद्र आहे. या आयटी हबमुळे पुण्याचे नाव जगाच्या पटलावर झळकत आहे. आयुक्तांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. बदल व्हावा ही फक्त पोलिसांची इच्छा असून उपयोग नाही, नागरिकांचे सहकार्य हवे आहे.’’

Web Title: ITIs breathe freely in traffic jams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.