उद्यानाच्या प्रतीक्षेत आयटीनगरी

By admin | Published: August 31, 2016 01:07 AM2016-08-31T01:07:22+5:302016-08-31T01:07:22+5:30

राजीव गांधी आयटी पार्क, जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल असणारी ग्रामपंचायत असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान किंवा उद्यान उपलब्ध नाही

ITNAGER awaiting the park | उद्यानाच्या प्रतीक्षेत आयटीनगरी

उद्यानाच्या प्रतीक्षेत आयटीनगरी

Next

हिंजवडी : राजीव गांधी आयटी पार्क, जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल असणारी ग्रामपंचायत असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान किंवा उद्यान उपलब्ध नाही. खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे मुलांची गैरसोय होत आहे. अनेक क्षेत्रांत आघाडीवरील हिंजवडी ग्रामपंचायतीने चांगल्या दर्जाचे उद्यान उभारावे, अशी मागणी होत आहे.
मिळेल तेथे, मिळेल तितक्या जागेत बांधकाम व्यावसायिक इमारती उभारत आहेत. परिणामी, जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. व्यावसायिक स्तरावरही मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. वाढती वाहनसंख्या आणि रहदारीमुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. हिंजवडीत मॉल्स, हॉटेल, थिएटर, विविध शो-रूम, बँका, शाळा यांचा विस्तार होत आहे. लोकसंख्या वाढत आहे. केवळ पाच वर्षांत दुपटीपेक्षा अधिक मतदार वाढले आहेत. भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. परिणामी, गावचे गावपण हरवले आहे. यामुळेच महापालिकेप्रमाणेच चांगल्या दर्जाचे उद्यान हिंजवडी परिसरात व्हावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
(वार्ताहर)

Web Title: ITNAGER awaiting the park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.