जाधव खूनप्रकरण : महाकाली, काळभोर टोळीला मोक्का? तोडफोड, दहशत पसरविण्याचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 03:09 AM2017-12-03T03:09:47+5:302017-12-03T03:09:50+5:30
रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा आकुर्डीत २० नोव्हेंबरला खून झाला. या खुनाच्या घटने आगोदर अनिकेतने महाकाली टोळीचा प्रमुख हणम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
पिंपरी : रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा आकुर्डीत २० नोव्हेंबरला खून झाला. या खुनाच्या घटने आगोदर अनिकेतने महाकाली टोळीचा प्रमुख हणम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
अनिकेतच्या खून प्रकरणात महाकाली टोळीतील सदस्यांसह काळभोर टोळीचा प्रमुख सोन्या काळभोर याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून, त्यांच्या या गुन्हेगारी कारवायांची गंभीर दखल घेत पोलिसांनी या टोळ्यांवर मोक्का लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
मिलिंदनगर भागातही अशाच पद्धतीने वाहनांची तोडफोड आणि नागरिकांच्या घरावर दगडफेक करणा-या टोळक्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मोक्का लावल्यानंतर आकुर्डी, रावेत परिसरातही गुंडगिरीवर नियंत्रण येऊ शकेल, या उद्देशाने पोलिसांनी मोक्काच्या कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
- भोसरीत वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविल्याप्रकरणी सोन्या काळभोरसह त्याच्या २२ साथीदारांविरुद्ध मोक्काअंतर्गतची कारवाई हाती घेण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे ही कारवाई होऊ शकली नाही. अलीकडच्या काळात मात्र या टोळ्यांची दहशत पसरविणारी कृत्य वाढली. टोळीयुद्धातून गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढू लागताच, पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी पोलीस उपायुक्त परिमंडल तीन कार्यालयाअंतर्गतच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाई केल्या आहेत. घरावर दगडफेक, वाहनांची तोडफोड करणाºया नेहरूनगर भागातील दोन टोळ्यांना मोक्का लावला. त्यानंतर त्या परिसरातील दहशत माजविण्याच्या प्रकारावर नियंत्रण आले आहे.