तुरुंगात भेटले अन् बाहेर पडून पिस्तूल खरेदी केले, चार सराईत गुन्हेगारांना अटक

By नारायण बडगुजर | Published: October 2, 2023 08:16 PM2023-10-02T20:16:54+5:302023-10-02T20:17:35+5:30

पाच पिस्तूल, दहा काडतुसे जप्त...

Jail Meets and Breaks Out to Buy Pistols, Four Outlaws Arrested | तुरुंगात भेटले अन् बाहेर पडून पिस्तूल खरेदी केले, चार सराईत गुन्हेगारांना अटक

तुरुंगात भेटले अन् बाहेर पडून पिस्तूल खरेदी केले, चार सराईत गुन्हेगारांना अटक

googlenewsNext

पिंपरी : चार सराईत गुन्हेगारांची तुरुंगात भेट झाली. तेथून बाहेर पडून त्यांनी पिस्तूल खरेदी केले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने चौघांना अटक करून त्यांच्याकडून पाच पिस्तूल आणि दहा काडतुसे जप्त केली. 

अस्लम अहमद शेख (रा. थेरगाव), सचिन उत्तम महाजन (रा. सुरवड, ता. इंदापूर), संतोष विनायक नातू (रा. स्वारगेट, पुणे), राहुल उर्फ खंडू गणपत ढवळे (रा. पिंपळगाव, ता. दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलिस रमेश गायकवाड, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे हे रहाटणी येथे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, जगताप डेअरी चौकात एकजण थांबला असून त्याच्याकडे शस्त्र आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अस्लम शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी करून त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. तसेच आणखी चार पिस्तूल आणि दहा काडतुसे असा एकूण दोन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

सचिन, संतोष, राहुल हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पुणे, पुणे ग्रामीण आणि सोलापूर येथे दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीरपणे अग्नीशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. सचिन महाजन याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘मोका’ची कारवाई केली आहे. तर संतोष नातू याला पुणे पोलिसांनी तडीपार केले आहे.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उध्दव खाडे, सहायक उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अमर राऊत, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, सुनील कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, प्रदीप गायकवाड, शैलेश मगर, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस, प्रदीप गुट्टे, भरत गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

मध्यप्रदेशातून आणली शस्त्रे

मध्यप्रदेशात साडपुडा पर्वत रांगांतील दुर्गम भागातील उमरटी येथून चौघांनी शस्त्रे आणली. मात्र, ते नेमके कशासाठी आणले, त्याची विक्री करणार होते का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: Jail Meets and Breaks Out to Buy Pistols, Four Outlaws Arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.