खुनाच्या दोन गुन्ह्यांत सात वर्षे फरार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 07:14 PM2020-02-26T19:14:30+5:302020-02-26T19:15:19+5:30

कोयत्याने वार करत तसेच गोळीबार करून दोन खून केलेला आरोपी सात वर्षांपासून फरार होता. चाकण आणि म्हाळुंगे परिसरात त्याने दहशत निर्माण केली होती. त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

Jailed for seven years for two counts of murder | खुनाच्या दोन गुन्ह्यांत सात वर्षे फरार आरोपी जेरबंद

खुनाच्या दोन गुन्ह्यांत सात वर्षे फरार आरोपी जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देपिस्तूल व काडतूस जप्त : गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांची कारवाई

पिंपरी : कोयत्याने वार करत तसेच गोळीबार करून दोन खून केलेला आरोपी सात वर्षांपासून फरार होता. चाकण आणि म्हाळुंगे परिसरात त्याने दहशत निर्माण केली होती. त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 


संतोष मधुकर मांजरे (वय २९, मूळ रा. मांजरेवाडी, सध्या रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन खुनाच्या गुन्ह्यात सात वर्षांपासून फरार असलेला आरोपी निगडी येथील ओटास्किम येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी ओटास्किम परिसरात सापळा लावला. आरोपी संतोष मांजरे तेथे एका रिक्षातून आला. तो कोणाच्यातरी प्रतीक्षेत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची झडती घेतली. त्याच्याकडे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
आरोपी संतोष आणि त्याचा साथीदार मंगेश गाडे या दोघांनी मार्च २०१३ मध्ये दत्तात्रय नामदेव घनवट (रा. कोरेगाव खुर्द) यांच्यावर कोयत्याने वार करून खून केला होता. त्यानंतर एका महिन्यानंतर एप्रिल २०१३ मध्ये संतोष, त्याचे साथीदार कैलास जावळे, सागर जावळे यांनी राजकीय वादातून धनंजय वसंत आवटे (रा. कुरकुंडी) यांच्यावर कोयत्याने वार करत तसेच गोळी झाडून निघृणपणे खून केला होता. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये संतोष सात वर्षांपासून फरार होता. त्याने चाकण आणि म्हाळुंगे परिसरात दहशत निर्माण केली होती. 
पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, दिलीप चौधरी, संपत निकम, संजय पंधरे, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, उषा दळे, विपुल जाधव, आतिष कुडके, शिवाजी मुंडे, अजित सानप, नामदेव राऊत, नामदेव कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: Jailed for seven years for two counts of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.