Video: हिंजवडीत पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सवर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 03:22 PM2024-08-02T15:22:16+5:302024-08-02T15:23:06+5:30

अंत्यत वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीने दिवसभर व्यस्त असलेल्या लक्ष्मी चौकात भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने आयटीपार्क परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे

Jewelers robbed at gunpoint in Hinjewadi The incident was caught on CCTV | Video: हिंजवडीत पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सवर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद

Video: हिंजवडीत पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सवर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद

हिंजवडी : पिस्तुलाचा धाक दाखवून हिंजवडीतील  ज्वेलर्सवर दरोडा घालण्यात आला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरु केला आहे. सदर घटना हिंजवडीतील लक्ष्मी चौक येथे शुक्रवारी (दि.२) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी चौक येथे शिवमुद्रा नावाने ज्वेलर्सचे दुकान आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास दुकान उघडल्यानंतर काही वेळातच अज्ञात चोरटे दुकानात घुसले. पिस्तुलाचा धाक दाखवत सराफाला मारहाण केली. त्यानंतर काही ऐवज चोरून नेल्याचे समजते. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. दरम्यान, अंत्यत वर्दळीच्या आणी वाहतूक कोंडीने दिवसभर व्यस्त असलेल्या लक्ष्मी चौकात भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने आयटीपार्क परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Jewelers robbed at gunpoint in Hinjewadi The incident was caught on CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.