दागिन्यांची पिशवी पळविणारा चोरटा जेरबंद

By admin | Published: July 5, 2017 03:20 AM2017-07-05T03:20:03+5:302017-07-05T03:20:03+5:30

रेल्वे प्रवाशाची सहा तोळे दागिने असलेली पिशवी घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास रेल्वे पोलिसांनी शिताफीने

Jewelery bag | दागिन्यांची पिशवी पळविणारा चोरटा जेरबंद

दागिन्यांची पिशवी पळविणारा चोरटा जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : रेल्वे प्रवाशाची सहा तोळे दागिने असलेली पिशवी घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली. नारायण दत्ता लोणारे (वय ६०) असे या चोरट्याचे नाव आहे. चोरीस गेलली पिशवी पोलिसांनी मिळवून दिल्यानंतर प्रवाशाने आभार मानले.
पुणे रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ४ वर रेल्वे पोलिसांनी चोरट्याला पकडले. रेल्वे पोलिसांना एक व्यक्ती संशयितरित्या वावरताना आढळून आली. त्या व्यक्तीच्या हालचालीवर पोलीस बलाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवले. आसनाखाली ठेवलेली पिशवी उचलून चोरट्याने बाहेर आणून पाणपोईजवळ ठेवली. तो काही अंतरावर थांबला होता. त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनीफलाट क्रमांक ४ जवळील डब्यात जाऊन प्रवाशांना कोणाची पिशवी हरवली आहे का? याबद्दल विचारणा केली. त्या वेळी मोहम्मद हुसेन शेखने पिशवी चोरीस गेल्याचे सांगितले.

अशी झाली गुन्ह्याची उकल
रेल्वे सुरू होत असतानाच चोरट्यााने पिशवी उचलण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी ज्याची चोरी झाली त्या प्रवाशाला फलाट क्रमांक ४ वर पाणपोईजवळ ठेवलेली पिशवी दाखवली. ती पिशवी आपलीच आहे, हे प्रवाशाने ओळखताच, रेल्वे पोलिसांनी पिशवी उचलण्यास आलेल्या चोरट्याला पकडले.

Web Title: Jewelery bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.