प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचे पावणेदोन लाखांचे दागिने केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 17:00 IST2020-01-03T16:58:32+5:302020-01-03T17:00:29+5:30

रावेत ते वारणानगर, रत्नागिरी व कुवरबाव ते रावेत दरम्यानच्या प्रवासात चोरी

jewellery thieft of senior citizen from theDuring the journey | प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचे पावणेदोन लाखांचे दागिने केले लंपास

प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचे पावणेदोन लाखांचे दागिने केले लंपास

ठळक मुद्दे याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : पत्नी, मुलगी व नातीसह प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. एकूण एक लाख 83 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. रावेत ते वारणानगर, रत्नागिरी व कुवरबाव ते रावेत दरम्यानच्या प्रवासात चोरीचा प्रकार घडला. 

निशिकांत राजाराम परीट (वय 66, रा. शिंदेवस्ती, गणेशनगर, रावेत) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परीट हे पत्नी, मुलगी व नातीसह प्रवास करीत होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील एक लाख 83 हजार 400 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: jewellery thieft of senior citizen from theDuring the journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.