‘जेएनएनयूआरएम’ प्रकल्पांची चौकशी
By admin | Published: January 13, 2017 03:08 AM2017-01-13T03:08:52+5:302017-01-13T03:08:52+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान (जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत राबविण्यात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान (जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांत भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाने केली होती. पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीची दखल घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘जेएनएनयूआरएम’ योजनेंतर्गत राबविलेल्या विकास प्रकल्पांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी निवेदनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत निवेदन देण्यात आले होते. पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीची त्वरित दखल घेतली. संबंधित विभागाला कार्यवाहीचेआदेश दिलेआहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटींचे विकास प्रकल्प आले. त्यात महापालिकेचे अधिकारी महापालिकेतील सत्ताधारी आणि काही राजकीय व्यक्तींनी संबंधित ठेकेदारांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
महापालिकेच्या वतीने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटींचे विकास प्रकल्प आले. या योजनेअंतर्गत विकास प्रकल्प राबविताना अनियमितता होती. या तक्रारीची दखल घेतली आहे. (प्रतिनिधी)