‘जेएनएनयूआरएम’ची होणार चौकशी

By admin | Published: May 1, 2017 02:53 AM2017-05-01T02:53:37+5:302017-05-01T02:53:37+5:30

महापालिकेतर्फे शहरात जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांत भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी

"JNNURM's inquiry will be conducted | ‘जेएनएनयूआरएम’ची होणार चौकशी

‘जेएनएनयूआरएम’ची होणार चौकशी

Next

पिंपरी : महापालिकेतर्फे शहरात जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांत भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जेएनएनयूआरएम विभागाकडून याची चौकशी सुरू केली आहे.
महापालिकेने जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत राबविलेल्या विकास प्रकल्पांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी निवेदनातून पंतप्रधानांच्याकडे केली होती. पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत शुक्रवारी निवेदन दिले. पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीची त्वरित दखल घेतली.
याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. पंतप्रधान कार्यालयातील कक्ष अधिकारी कुमार शैलेंद्र यांनी याबाबतचे आदेश दिले. उपसचिव जी. रविंदर यांच्या अखत्यारित याप्रकरणी चौकशीची कार्यवाही होणार आहे.
मंगळवारी याप्रकरणी चौकशीची कार्यवाही सुरू झाली आहे. या प्रकरणातील चौकशी सुरू झाल्यामुळे यातील घोटाळा बहाद्दरांचा चेहरा सामान्यांसमोर येणार आहे. महापालिकेत  भ्रष्टाचार झाला होता. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा आहे.  त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा गैरव्यवहार चव्हाट्यावर येण्यास मदत  होणार आहे.(प्रतिनिधी)

अधिकारी, पदाधिकारी येणार अडचणीत
शहरात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत सुमारे दोन हजार कोटींचे विकास प्रकल्प आले. त्यात महापालिकेचे अधिकारी महापालिकेतील तत्कालीन पदाधिकारी आणि काही राजकीय व्यक्तींनी संबंधित ठेकेदारांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी केली आहे.

Web Title: "JNNURM's inquiry will be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.