लोकमत व व्हिस्पर चॉईस यांचा संयुक्त उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:21 AM2017-11-24T01:21:10+5:302017-11-24T01:21:27+5:30
पिंपरी : ‘ते चार दिवस’ तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतात. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला, तरी सुरुवातीला त्यामुळे ती बावरून, गोंधळून तर कधी घाबरून गेलेली असते.
पिंपरी : ‘ते चार दिवस’ तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतात. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला, तरी सुरुवातीला त्यामुळे ती बावरून, गोंधळून तर कधी घाबरून गेलेली असते. या विषयावर मनमोकळेपणाने बोलायचे कुणाशी, हा प्रश्नही तिला कायम पडलेला असतो.
अनेकदा आई आणि मुलीमध्येही या विषयावर मोकळेपणाने संवाद होऊ शकत नाही. त्यामुळेच ‘लोकमत’ आणि व्हिस्पर चॉईस यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीसाठी ‘घे उंच भरारी’ उपक्रम आयोजित केला. मंगळवारी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमामुळे जणू प्रत्येक मुलीला आपल्या आकांक्षांकडे उंच भरारी घेण्याचे पाठबळच मिळाले.
‘घे या कार्यक्रमामुळे या नाजूक विषयावर संवाद साधण्यासाठी प्रत्येक आई आणि मुलीला एक मंच मिळाला आणि एकेका प्रश्नाची उकल होऊन मुलींच्या मनातील शंका दूर झाल्या.
मुलींना आणि महिलांना या विषयावर मार्गदर्शन करून व्हिस्परसंगे उंच भरारी घेण्याची प्रेरणा दिली. व्हिस्परच्या प्रतिनिधी प्रतिमा राऊत यानी मासिक पाळीदरम्यान पॅड कसे वापरावे, याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली़
आता व्हिस्पर चॉईस वापरल्यामुळे आपल्या मुलींची शाळा चुकणार नाही व तिच्या स्वप्नांना भरारी मिळणार, यावर सगळ्यांचेच एक मत झाले. अशा प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवून व्हिस्पर चॉईस जास्तीत जास्त मुलींना या विषयावर सक्षम करण्यात प्रयत्नशील आहे. शेवटी उपस्थित सर्व महिलांना आणि मुलींना व्हिस्पर चॉईसच्या सॅम्पलचे मोफत वाटप करण्यात आले़
>‘घे उंच भरारी’ या उपक्रमाद्वारे महिलांना आणि मुलींना मनमुराद बागडण्यासाठी एक मंच मिळाला होता. सुरुवातीला मुलींसाठी दोरीवरच्या उड्या, फुगड्या अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला.
आजच्या स्पर्धेच्या काळात मासिक पाळीमुळे मुलींची शाळा बुडण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. मासिक पाळीच्या काळातही मुलींना शाळेत आत्मविश्वासाने वावरता येण्यासाठी व्हिस्पर चॉईस वापरणे किती महत्त्वाचे आहे, हे एव्हीद्वारे दाखविण्यात आले. या काळात मुलींच्या मनावर सतत दडपण असते. त्या तणावग्रस्त असतात. या उपक्रमामुळे या सगळ्या समस्यांवर चपखल उपाय सापडला, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महिला व मुलींनी दिली. उपक्रमाच्या आयोजनाबाबत ‘लोकमत’ आणि व्हिस्पर चॉईसचे कौतुक केले.