पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार - विजया राहटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:55 AM2018-09-29T01:55:21+5:302018-09-29T01:55:37+5:30

पिंपरी व हिंजवडी येथील दोन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. या घटनेतील तपासाबाबत पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

Justice will give justice to the victims' families - Vijaya Rahatkar | पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार - विजया राहटकर

पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार - विजया राहटकर

Next

पिंपरी - पिंपरी व हिंजवडी येथील दोन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. या घटनेतील तपासाबाबत पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच, दोन्ही घटनेतील पीडित मुलींच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करणार असल्याचे, आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले.
या वेळी महापालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, नगरसेवक शीतल शिंदे, नामदेव ढाके, भाजपा नेत्या उमा खापरे, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, विधी समितीच्या माजी सभापती शारदा सोनवणे, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक आदी उपस्थित होते.
पिंपरीतील रमाबाईनगर येथून सात वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. तसेच, कासारसाई येथील ऊसतोडणी मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर नराधमांनी केलेल्या अत्याचाराची घटना नुकतीच घडली आहे. या दोन्ही घटनेतील पीडित कुटुंबीयांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी भेट घेतली. तसेच, पोलीस आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्याशी चर्चा केली.
रहाटकर म्हणाल्या,‘‘पिंपरी येथील घटनेतील आरोपींच्या शोधासाठी बाहेरच्या राज्यातही पोलिसांनी पथके पाठवलेली आहेत. या घटनेच्या तपासाबाबत पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. तसेच, आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करणार आहे. समाजानेही नराधमी प्रवृती रोखण्याची गरज असून विकृत मानसिकता वेळीच ठेचून काढली पाहिजे. तसेच, पीडित मुलींच्या कुटुंबीयांना लवकर न्याय मिळवून देणार आहे. देशभरातील अशा घटना थांबविण्यासाठी केंद्र सरकारने बाल लैंगिक अत्याचार कायद्यात बदल केला असून, या कायद्यात आरोपींना होणाºया शिक्षेची अंमलबजावणी तत्काळ करण्याची तरतूद केली आहे. या कायद्यातील बदलामुळे समाजातील विकृत मनोवृत्ती निश्चितपणे कमी होतील.

Web Title: Justice will give justice to the victims' families - Vijaya Rahatkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.