कांद्याची आवक घटून भाववाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:28 AM2017-07-31T04:28:08+5:302017-07-31T04:28:08+5:30
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची किरकोळ आवक झाल्याने भावात दुपटीने वाढ झाली.
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची किरकोळ आवक झाल्याने भावात दुपटीने वाढ झाली. तळेगाव बटाट्याची आवक घटूनही भावात घसरण झाली. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. हिरवी मिरची, टोमॅटो व चवळीची विक्रमी आवक झाली. बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली आहे. बाजारात १ कोटी ३५ लाख रुपयांची एकूण उलाढाल झाली.
चाकण बाजारात शनिवारी पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपूच्या भाजीची विक्रमी आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल व म्हशींची मोठी आवक झाली. शेळ्यामेंढ्यांच्या संख्येत तिपटीने घट झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण
जळगाव भूईमूग शेंगाची एकूण आवक २४ क्विंटल झाली. या शेंगांना ५ हजार ५०० रुपये असा कमाल भाव मिळाला. बंदूक भूईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ५ क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून कमाल भावही ५००० रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक २८९ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक ४४ क्विंटलने घटूनही भाव कोसळले.