By admin | Published: February 8, 2017 11:22 PM2017-02-08T23:22:04+5:302017-02-08T23:22:04+5:30
कपबशी, नारळाला पंसती
Next
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीसाठी आज चिन्ह वाटप करण्यात आले. त्यात पक्षाचे अधिकृत पंजा, घड्याळ, कमळ, धनुष्यबान, इंजिन या अधिकृत चिन्हांसह अपक्षांनी कपबशी आणि नारळ या चिन्हास पसंती देण्यात आली.
महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर बुधवारी सकाळपासून चिन्ह वाटपाचे काम शहरातील अकरा निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात झाले. पक्षांचे अधिकृत चिन्ह सोडून इतर उमेदवारांना पंसती क्रमानुसार चिन्हे देण्यात येत होती. तर अपक्ष उमेदवार पॅनेल करण्याच्या दृष्टीने एकच चिन्ह मिळावे, यासाठी उमेदवार प्रयत्नशील होते. मात्र, काहींना एकसारखे चार चिन्हे मिळाली नाही. महापालिकेत निवडणूकीत यापूर्वी अपक्ष उमेदवारांनी त्यात कपबशी, नारळ चिन्हांवर परिवर्तन घडवून आणले आहे. त्यामुळे परिवर्तनाचे चिन्ह म्हणजेच संबंधित दोन चिन्हे अशी धारणा झाली होती. त्यामुळे या दोन चिन्हांना अधिक पसंती दिली. त्याचबरोबर शिट्टी, नारळ, रोडरोलर, बॅट, टिव्ही, पंतग, टॉर्च अशा विविध चिन्हांनाही पसंती दिली.
राष्ट्रवादीने १२६ उमेदवार जाहीर केले होते. त्यापैकी १२४ उमेदवारच निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. भारतीय जनता पक्षाने १२८ उमेदवार जाहीर केले होते. त्यापैकी भाजपाचे १२५ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तीन पुरस्कृत आहेत. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे ११९ उमेदवार निवडणुकीसाठी उतरविले आहेत. तर काँग्रेसने ७० उमेदवार दिले होते. त्यापैकी ५९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर मनसेचे ३७, एमआयएमचे १४, बहुजन रिपल्बीकन सोशालिस्ट पाटीर्चे १०, समाजवादी पार्टी ४, बहुजन समाज पार्टी १८, भारीप बहुजन महासंघाचे ६, बहुजन मुक्ती पार्टी ६, जनता दल सेक्युलर १, भारतीय शेतकरी कामगार पक्ष १, आरपीआय अ - ६, रिपब्लिकन सेना १, भारतीय नवजवान सेना १, सीपीआय (एम) ३, रासप १, अपक्ष २३६ असे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.