कामशेतला विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 04:05 AM2018-03-25T04:05:46+5:302018-03-25T04:05:46+5:30
येथील पंडित नेहरू विद्यालयात शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर वर्गात विद्यार्थ्यांची भांडणे झाली. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने काही न विचारता अमानुष मारहाण केली. यात या दोन्ही मुलांची पाठ काळी निळी झाली असून, एका मुलाच्या कानाला दुखापत झाली असल्याचे बोलले जात आहे.
कामशेत : येथील पंडित नेहरू विद्यालयात शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर वर्गात विद्यार्थ्यांची भांडणे झाली. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने काही न विचारता अमानुष मारहाण केली. यात या दोन्ही मुलांची पाठ काळी निळी झाली असून, एका मुलाच्या कानाला दुखापत झाली असल्याचे बोलले जात आहे.
शाळा सुटल्यानंतर आठवीच्या वर्गात काही विद्यार्थ्यांची भांडणे सुरू होती. ही भांडणे सोडवण्यासाठी पूजन सूरज मिस्त्री (वय १४) व मयूर जनार्धन ननावरे (वय १२) हे गेले असता गोंगाट काय सुरू आहे. हे पाहण्यासाठी आलेल्या एका शिक्षकाने भांडणे करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोडून या दोघांना पायातील बुटाने बेदम मारहाण केली. त्यांना तिसºया मजल्यावरून मारत मारत खाली आणले. यात या दोन्ही मुलांची पाठ काळी- निळी झाली असून त्याना मोठी दुखापत झाली आहे.
घरी गेल्यावर हा सर्व प्रकार पालकांना कळताच त्यांनी दुसºया दिवशी शाळेत येऊन संबंधित शिक्षकाला आमच्या समोर हजर करा, अशी मागणी केली. या वेळी सरपंच सारिका घोलप, शिवसेना शहर
प्रमुख गणेश भोकरे, गणेश बोºहाडे, सुजित सातकर, विशाल शिंदे
आदी मुख्याध्यापकांना जाब विचारण्यासाठी आले होते. त्यामुळे शाळेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
- संबंधित शिक्षक आज गैरहजर असून ते सोमवारी आल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक माहुले यांनी सांगितले. या मुलांचे पालक पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाच्या विरोधात तक्रार देण्यास गेले. मात्र शाळा प्रशासन व पालक यांच्यात परस्पर तडजोड होऊन तक्रार दिली गेली नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.