कार्ला अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू , मृतांची संख्या आठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:44 PM2018-07-16T14:44:30+5:302018-07-16T14:45:07+5:30

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी दोन कारमध्ये झालेल्या भिषण अपघातामधील जखमी प्रतिक बालाजी सरोदे (वय 18) या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. 

Karla accident update, one more got death | कार्ला अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू , मृतांची संख्या आठ

कार्ला अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू , मृतांची संख्या आठ

Next

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी दोन कारमध्ये झालेल्या भिषण अपघातामधील जखमी प्रतिक बालाजी सरोदे (वय 18) या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. 

    रविवारी दुपारी कार्ला फाटा येथे स्विफ्ट कार व सेंन्टो कार यांच्यात झालेल्या भिषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यु झाला होता तर तीन जण जखमी झाले होते. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली स्विफ्ट कारच्या (MH 14 CX 8339)  चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर सदर कार रस्ता दुभाजकावरुन विरुद्ध लेनवर जात पुण्याच्या दिशेने येणा-या सॅन्ट्रो कारला ( MH 12 EX 1682) जोरात धडकली. जखमींपैकी सोमाटणे फाटा येथिल खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या प्रतिकचा आज सकाळी मृत्यु झाला.या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Karla accident update, one more got death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.