‘जागते रहो’मुळे चाकण औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारांना बसला चाप; दादागिरीला पायबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:58 AM2018-12-16T00:58:00+5:302018-12-16T00:58:27+5:30

एमआयडीसीमध्ये रॉबरी टोळ्यांनी अनेक दरोडे टाकले होते. एमआयडीसीमधूनच दरोड्याच्या तयारीत असतानाच घातक शास्त्रांसह तीन टोळ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

'Keep Awake' to the criminals in Chakan industrial estate; Dadagiri footpath | ‘जागते रहो’मुळे चाकण औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारांना बसला चाप; दादागिरीला पायबंद

‘जागते रहो’मुळे चाकण औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारांना बसला चाप; दादागिरीला पायबंद

googlenewsNext

आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहतीमधील लूटमार, दरोडे, चोऱ्या, दादागिरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना यश मिळत असून, यासाठी दिवसरात्र एमआयडीसीमध्ये गस्तीपथक सुरू करण्यात आले आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगार व उद्योजकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. पोलिसांच्या ‘जागते रहो’ या अभियानामुळे गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतला असल्याने गुन्हेगारीला चाप बसला आहे.

काही दिवसांपूर्वी चाकण औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामगारांना रात्रीअपरात्री छोट्यामोठ्या लूटमारीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी कामगार काम करण्यास टाळाटाळ करीत होते. तसेच, ठेकेदारीसाठी कंपनी व्यवस्थापन अधिकारी व उद्योजकांनाही धमकावण्याचे प्रकार घडत होते. या सगळ्या गोष्टींमुळे एमआयडीसीत असुरक्षेची भावना निर्माण झाली होती. चाकण पोलीस ठाण्याचा नव्याने निर्माण झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात समावेश झाल्यावर उद्योजक व पोलीस अधिकारी यांच्यामध्ये बैठक घेऊन सर्व अडचणी लवकर सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वरिष्ट पोलीस अधिकाºयांनी दिली होती.
एमआयडीसीमध्ये रॉबरी टोळ्यांनी अनेक दरोडे टाकले होते. एमआयडीसीमधूनच दरोड्याच्या तयारीत असतानाच घातक शास्त्रांसह तीन टोळ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी कामगारांना हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करणारे अनेक जण गजाआड झाल्याने लूटमारीच्या घटनांना काही प्रमाणात पायबंद बसला आहे. अनेक चोºयांमध्ये कंपनीच्या सुरक्षारक्षकांचाच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. साप्ताहिक सुटीच्या दिवशी व रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणाºयांना गस्तीवरील पथकाच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भुरट्या चोºयांवर आळा बसला आहे.

औद्योगिक वसाहतीत ‘जागते रहो’ अभियान सुरू करण्यात आले आहे. तसेच, औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी कारवाया करणाºया व पूर्वीच्या विविध गुन्ह्यांत हवे असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली जात आहे. गुन्हेगारांचे नेटवर्क पोलिसांना तोडण्यात यश मिळाले आहे. मागील काही दिवसांमध्ये गस्तीपथकाने रात्रीच्या वेळी अवैधरीत्या गावठी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे विकण्याचा प्रयत्न करणाºयांना शिताफीने अटक करण्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीत कामाचे ठेके आपल्यालाच मिळावेत, यासाठी उद्योजकांना व कंपनी अधिकाºयांना धमकावणायांना गजाआड करण्यात आले आहे.

एमआयडीसीमधील सर्वच कारखानदारांनी आम्हाला सहकार्य करावे. कारण बहुतेक कंपन्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कंपन्यांनी सुरक्षारक्षक एजन्सी व सुरक्षारक्षकांची पडताळणी करूनच कामावर नेमणूक करावी. त्यामुळे कंपनीत होणाºया चोºयांच्या घटना कमी होतील. कंपनीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पोलीस ठाणे, बीट अंमलदार व गस्तीपथकाचे संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत. - सुनील पवार,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक.

Web Title: 'Keep Awake' to the criminals in Chakan industrial estate; Dadagiri footpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.