कालेवाडीत ७४ पजणांना अन्नातून विषबाधा
By admin | Published: May 22, 2017 01:48 PM2017-05-22T13:48:31+5:302017-05-22T13:48:31+5:30
काळेवाडी राहाटणी येथील थोपटे लौन्स येथे एका विवाह समारंभात अन्नातून विषबाधा झाली, ७४ जणांना विषबाधा झाली.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 22 - काळेवाडी राहाटणी येथील थोपटे लौन्स येथे एका विवाह समारंभात अन्नातून विषबाधा झाली, ७४ जणांना विषबाधा झाली, रात्री उशिरा त्यांना वाया सी एम रुग्णालय पिंपरी आणि औंध सर्वोपचार रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे. काहींना घरी सोडले तर काही रुग्णालयात आहेत, त्यांची प्रकृती ठीक आहे,
रोकडे आणि भोगले यांच्या इवाह समारंभात जेवणानंतर आईस क्रिम देण्यात आली, रात्री ८.३० ला त्यांना उलट्या, मळमळ असा त्रास हाऊ लागला,५४ जणांना औंध रुग्णालयात दाखल केले, २० जणांना पिम्परीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. यामध्ये पुरुष,महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे, आतापर्यंत दोन्ही रुग्णालयातील १५ जणांना घरी सोडले आहे, इतरांना ऑब्झर्वशनखाली ठेवले आहे.
सर्वांची प्रकृती ठीक आहे, काळजी करण्यासारखे काही नाही,असे वायसीएम रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ सतीश इंगळे यांनी सांगितले. केटरिंगचे काम करणारे गोपाळ ठाकूर आणि अर्जुन ठाकूर या दोघांना वाकड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.