रेशन दुकानात केरोसिन बंद
By admin | Published: December 24, 2016 12:24 AM2016-12-24T00:24:25+5:302016-12-24T00:24:25+5:30
रास्त भाव दुकानदारांवर लादण्यात आलेले कडक नियम शिथिल करावेत, अशी मागणी आॅल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स
पिंपरी : रास्त भाव दुकानदारांवर लादण्यात आलेले कडक नियम शिथिल करावेत, अशी मागणी आॅल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे . म् ाागण्या मान्य कराव्यात अन्यथा १ जानेवारीपासून राज्यातील रास्त भाव दुकानदार व हॉकर्स, किरकोळ केरोसिन परवानाधारक हे बेमुदत धान्य व केरोसिनची उचल व वितरण करणार नसल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
बाबर म्हणाले की, राज्यातील रास्त भाव दुकानदारांना केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न सुरक्षा योजनेद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यासाठी शासनाने सर्व दुकानदारांना शासकीय गोदामातून दुकानापर्यंत हमाली मुक्तद्वारे धान्य पोहोच करावयाचे आहे. आजपर्यंत शासन काही जिल्हा वगळता द्वारपोहोच याजनेंतर्गत धान्याचा कोटा दुकान पोहोच करीत नाहीत. यासाठी संबंधित खात्याकडून द्वारपोच धान्याचा कोटा मिळावा.
राज्यातील हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवानाधारकांना शासनाच्या नवीन धोरणात्मक निर्णयानुसार ठरवून दिलेल्या प्रमाणात अत्यंत अल्पशा प्रमाणात केरोसिन कोटा वितरणास मिळत आहे. या मिळणाऱ्या केरोसिन कोट्यातून मिळणाऱ्या नफ्यामधून परवानाधारकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होत नसून, उपासमारीची वेळ येत आहे. यासाठी केरोसिन वितरणाचे प्रमाण वाढवून संपूर्ण कोटा मिळावा. (प्रतिनिधी)