केशवनगर येथे डोक्यात दगड घालून कामगाराचा खून, पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचं सत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 05:00 PM2017-09-24T17:00:48+5:302017-09-24T17:01:11+5:30

चिंचवड येथील केशवनगर परिसरात डोक्यात फरशी घालून एका कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. केशवनगरजवळ जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने रविवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

Keshavnagar's stone-throwing worker, Pimpri-Chinchwad murder case begins | केशवनगर येथे डोक्यात दगड घालून कामगाराचा खून, पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचं सत्र सुरूच

केशवनगर येथे डोक्यात दगड घालून कामगाराचा खून, पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचं सत्र सुरूच

googlenewsNext

पिंपरी, दि. 24 -  चिंचवड येथील केशवनगर परिसरात डोक्यात फरशी घालून एका कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. केशवनगरजवळ जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने रविवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राम सनेही (वय ३२, रा. मध्य प्रदेश), असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे.

घटना स्थळाची पाहणी केली असता पोलिसांनी हा खून दारूच्या नशेत केला असावा, असा अंदाज व्यक्त केला. आसपासच्या परिसरात संबंधित कामगारांना कोणीही ओळखत नाही. चिंचवड येथील केशवनगर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये मृत इसम आणि त्याचा आणखी एक साथीदार राहत होते. येथेच आरोपीने दारूच्या नशेत भांडणात रामच्या डोक्यात फरशी घातली, त्याचा खून केला. खून करून मृतदेह ओढत नेऊन जवळच असलेल्या गवतात फेकून दिला. हा खून शनिवारी रात्री झाला असून रविवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली आहे. मात्र आरोपीची ओळख पटलेली नाही, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात खुनाच्या सात घटना घडल्या आहेत. आॅगस्टमध्ये ३ आॅगस्टला स्वाती संजय वाघोलीकर या तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले.  २१ आॅगस्टला शंकर झेंडे यांचा डोक्यात प्रहार करून खून केल्याचे उघडकीस आले. निगडी येथे ही घटना घडली, आरोपींनी अपघात घडल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होता. दुचाकीची चावी दिली नाही म्हणून बालाजीनगर येथे २८ आॅगस्टला सतीश इंदले या तरुणाचा खून झाला. आॅगस्ट महिन्यातील खून सत्र संपले नाही तोच सप्टेंबरच्या सुरूवातीला १ सप्टेंबरला वाकड येथे महेश वाळवे या तरूणाचा पाचशे रूपये उसने देण्यास नकार दिला म्हणून खून करण्यात आला. २ सप्टेंबरला आदित्य जैद या विद्यार्थ्याचा खून झाला. काही दिवस उलटले नाही तोच ११ सप्टेंबरमध्ये देहू रोडला एकाचा डोक्यात दगड घालून खून झाला. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राम सनेही या परप्रांतीय कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. 

Web Title: Keshavnagar's stone-throwing worker, Pimpri-Chinchwad murder case begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.