अहिराणी कला अन् संस्कृती दर्शन, १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:18 AM2018-09-26T02:18:53+5:302018-09-26T02:19:22+5:30

खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने दिनांक १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात खान्देशी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे, अशी माहिती मंचाच्या प्रमुख विजया मानमोडे यांनी दिली.

Khandesh Cultural Festival on 14th October | अहिराणी कला अन् संस्कृती दर्शन, १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

अहिराणी कला अन् संस्कृती दर्शन, १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

Next

पिंपरी  - खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने दिनांक १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात खान्देशी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे, अशी माहिती मंचाच्या प्रमुख विजया मानमोडे यांनी दिली.
भोसरीतील कै. अंकुश लांडगे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून, सकाळी नऊ वाजता अहिराणी लोकसंगीत शोभायात्रा व उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अहिराणी लोकगीत- संगीत नृत्याचे कार्यक्रम होणार आहे. कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा महोत्सव होणार आहे. सायंकाळी पाच वाजता पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत आजोळची गाणी हा सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. साहित्यिक ना. धों. महानोर उपस्थित राहणार आहेत.
विजया मानमोडे म्हणाल्या, ‘‘खान्देशातील कलाकारांना व्यासपीठ मिळणार असून पारंपरिक
खान्देशी अहिराणी लोकगीत-संगीत, नृत्याचा आविष्कार शहरवासीयांना अनुभवावयास मिळणार आहे. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर
यांनीही महोत्सवाला शुभेच्छा
दिल्या आहेत. खान्देशी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. त्यात विविध कलावंतांना संधी देण्यात येणार आहे.’’

कलाकारांना मिळणार संधी
आपल्या खान्देशातील कलाकारांना संधी मिळाली म्हणून पारंपरिक खान्देशी अहिराणी लोकगीत- संगीत,नृत्य सादर करण्यात येणार आहेत. त्यासाठी खान्देश आहिराणी कस्तुरी मंच संधी उपलब्ध करून देणार आहे . त्यामुळे इच्छुक असलेल्या कलाकारांनी कस्तुरी मंचाकडे १४ आक्टोबरपूर्वी संपर्क करावा. या दिवशी सकाळी ९ वाजता अहिराणी लोक संगीत शोभा यात्रा व उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत अहिराणी लोकगीत- संगीत नृत्याचा आनंद सर्वांना घेता येईल. कलाकारांना सांस्कृतिक कला सादर करण्यासाठी भव्य व्यासपीठ मिळेल. सायंकाळी ५ वाजता पंडित हृदयनाथ मंगेशकर व त्यांच्या समूहाचा आजोळची गाणी हा सुमधुर गाण्यांचा आस्वाद घेण्याचे भाग्य प्रेक्षकांना मिळणार आहे.

Web Title: Khandesh Cultural Festival on 14th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.