ॲपव्दारे बुक केलेल्या गाडीतून ‘आयटी’तील महिलेचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 06:11 PM2023-02-16T18:11:37+5:302023-02-16T18:11:46+5:30

वाहन सिग्नलवर थांबले असता नागरिकांनी महिलेची सुटका केली

Kidnapping of a woman in IT from a car booked through the app | ॲपव्दारे बुक केलेल्या गाडीतून ‘आयटी’तील महिलेचे अपहरण

ॲपव्दारे बुक केलेल्या गाडीतून ‘आयटी’तील महिलेचे अपहरण

Next

पिंपरी : आयटी क्षेत्रात खासगी नोकरी करीत असलेल्या महिलेने रायडिंग ॲपव्दारे चारचाकी वाहन बुक केले. त्यानंतर चालकाने गाडी दुसऱ्याच रस्त्याने नेली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर वाहन सिग्नलवर थांबले असता नागरिकांनी महिलेची सुटका केली. बाणेर येथे १ फेब्रुवारी २०२३ रोजी पावणेसात ते सव्वासात या कालावधीत हा प्रकार घडला. 

योगेश लहानू नवाळे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ४४ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. १५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही आयटी क्षेत्रात खासगी नोकरी करते. महिलेने रायडिंग ॲपव्दारे चारचाकी वाहन बुक केले. त्यावेळी योगेश नवाळे हा गाडी घेऊन आला. त्याच्या वाहनात फिर्यादी महिला बसली असता आरोपीने गाडी दुसऱ्याच रस्त्याने नेले. त्याबाबत फिर्यादी महिलेने विचारणा केली. मात्र, तरीही आरोपीने वाहन भरधाव चालवले. त्यामुळे फिर्यादी महिलेने आरडाओरडा केला. ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली. दरम्यान सिग्लनवर इतर गाड्या थांबल्या असल्याने आरोपीचीही गाडी तेथे थांबली. त्यावेळी इतर नागरिकांनी फिर्यादी महिलेला आरोपीच्या गाडीतून बाहेर काढून सुटका केली. 

आरोपीने वाहन दामटल्याने फिर्यादीच्या जीवीताला धोका निर्माण केला व फिर्यादीला जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी १५ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके तपास करीत आहेत.

Web Title: Kidnapping of a woman in IT from a car booked through the app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.