"राजकीय नेत्यांची दादागिरी, अधिकाऱ्यांचा आणि पतपेढीचा भ्रष्टाचार बाहेर काढणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 11:44 AM2022-12-06T11:44:08+5:302022-12-06T11:48:20+5:30
किरीट सोमय्या यांनी सोमवारी तळेगाव दाभाडे येथे माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली...
तळेगाव दाभाडे (पुणे) : पतपेढींचा भ्रष्टाचार, दादागिरी व छोट्या शेतकऱ्यांवर होत असलेला अत्याचार जे कोणी राजकीय नेते, सरकारी अधिकारी करतात अशांचा भ्रष्टाचार आजपासून बाहेर काढणार असल्याचे माजी खासदार व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. किरीट सोमय्या यांनी सोमवारी तळेगाव दाभाडे येथे माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आंबेगाव तालुका भाजपचे अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, शहराध्यक्ष रवींद्र माने, स्वप्नील भेगडे, संदीप नाटक, अंशू पाठक, किरण ओसवाल, विलास ओसवाल, माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल उपस्थित होते.
समुद्रकिनाऱ्याची जमीन जे मंत्री अनिल परब यांनी खाल्ली होती. ती पंधरा हजार स्क्वेअर फूट जागा अनिल परब यांच्या कॉन्ट्रॅक्टरने कलेक्टरच्या हातात दिली. इथला हिशोब इथेच द्यावा लागतो. रिसॉर्ट तुटला अनिल परब व सदानंद कदमवर एफआयआर झाला. अनिल परबवर तीन केसेस सुरू आहेत. त्यामुळे कोणाच्याही मार्फत काही पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी अथर रोड जेलमध्ये एक कोठडी मोकळी झाली आहे. हे सदानंद कदम, अनिल परब व जे कोणी सरकारी अधिकारी त्यांना मदत करत आहेत त्यांनी लक्षात ठेवा, असेही सोमय्या म्हणाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांना विचारणा केली असता सोमय्या म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. संपूर्ण देशातील नागरिक त्यांना मानतात. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. कोणाची काही बोलताना चूक झाली असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे व माफी देखील मागायला हवी.