कोतवालांना चार महिने पगारच नाही

By admin | Published: December 22, 2016 01:51 AM2016-12-22T01:51:20+5:302016-12-22T01:51:20+5:30

तहसीलच्या कार्यक्षेत्रातील महसूल विभागात काम करणाऱ्या कोतवालांना चार महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही.

Kotwala does not have to pay for four months | कोतवालांना चार महिने पगारच नाही

कोतवालांना चार महिने पगारच नाही

Next

लोणी काळभोर : तहसीलच्या कार्यक्षेत्रातील महसूल विभागात काम करणाऱ्या कोतवालांना चार महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे शासकीय राजशिष्टाचारात चोख कामगिरी बजावणाऱ्या कोतवालांना नोटाबंदीच्या काळात पगाराची रक्कम न मिळाल्याने मात्र बुरे दिन आले आहेत.
गावकामगार तलाठ्यांच्या गैरहजेरीत सर्व शेतकरी खातेदारांची कामे कोतवाल पार पडत असल्याने ग्रामीण भागात त्यांना मिनी तलाठी म्हणून ओळखले जाते. प्रशासनाकडून मासिक वेतन न मिळाल्यास मिनी तलाठ्यांना आंदोलन करावे लागेल, असे पुणे जिल्हा कोतवाल संघटनेने म्हटले आहे.
पुणे जिल्ह्यात गौणखनिज वसुलीचे काम असो अथवा महसूल विभागातील स्थळपाहणी, आपत्कालीन परिस्थिती, पंचनामा, संगणकीकृत सात-बारा यामध्ये कोतवाल सातत्याने तलाठ्यांना मदत करीत असतात. अगदी मंत्र्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रोटोकॉलची जबाबदारीही कोतवाल इमानेइतबारे पार पाडतात.
मात्र, पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ४३७ कोतवालांना पगारच न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोतवालांना त्वरित वेतन न दिल्यास प्रशासनच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा कोतवाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी दिली.
(वार्ताहर)

Web Title: Kotwala does not have to pay for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.