कुसगाव-वाकसईत ७० टक्के मतदान
By admin | Published: February 22, 2017 02:41 AM2017-02-22T02:41:07+5:302017-02-22T02:41:07+5:30
कुसगाव वाकसई जिल्हा परिषद गटासाठी मंगळवारी ७०.६६ टक्के मतदान झाले. ३०८७८ मतदारांपैकी २१८२०
लोणावळा : कुसगाव वाकसई जिल्हा परिषद गटासाठी मंगळवारी ७०.६६ टक्के मतदान झाले. ३०८७८ मतदारांपैकी २१८२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
वाकसई पंचायत समिती गणासाठी ६९.८५ टक्के मतदान झाले. या गणात १७६६१ मतदारांपैकी १२३३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ६८१७ पुरुष व ५५२० महिला मतदारांचा समावेश आहे. कुसगाव पंचायत समिती गणासाठी ७१.७५ टक्के मतदान झाले. या गणात १३२१७ पैकी ९?८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ५१४० पुरुष व ४३४३ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदार संघातील कार्ला व शिलाटणे या गावातील मतदान केंद्रांना आदर्श मतदान केंद्र बनविण्यात आली होती. मतदान केंद्र?ांच्या बाहेर मंडप बांधण्यात आला होता आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. मतदारांचे या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात होते. निवडणुक निरीक्षकांनी केंद्रांची पाहणी केली. सकाळी कुसगाव वाकसई गट व गणात काहीशा संथगतीने मतदान
सुरु होते. (वार्ताहर)
संथ प्रारंभ : दुपारनंतर आला वेग
७:३० ते ९:३० या पहिल्या दोन तासात वाकसई गणात ९.५० टक्के तर कुसगाव गणात ९.७१ टक्के मतदान झाले. ९:३० ते ११:३० वाकसई गणात १३.५० टक्के तर कुसगाव गणात १३.७८ टक्के मतदान झाले. दुपारच्या सत्रात ११:३० ते १:३० दरम्यान वाकसई गणात १४.४४ टक्के तर कुसगाव गणात १३.०१ टक्के, १:३० ते ३:३० दरम्यान मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत वाकसई गणात १६.७९ टक्के तर कुसगाव गणात १७.७९ टक्के मतदान झाले. सायंकाळच्या सत्रात ३:३० ते ५:३० दरम्यान वाकसई गणात १५.६२ टक्के तर कुसगाव गणात १७.३७ टक्के मतदान झाले.