वृद्ध, अपंगांच्या मूलभूत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:29 AM2018-07-17T01:29:13+5:302018-07-17T01:29:20+5:30

न्यायालयीन कामकाजानिमित्त येणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी पिंपरीतील मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीला रॅम्प नाही.

Lack of basic amenities like old age, disabled | वृद्ध, अपंगांच्या मूलभूत सुविधांचा अभाव

वृद्ध, अपंगांच्या मूलभूत सुविधांचा अभाव

Next

पिंपरी : न्यायालयीन कामकाजानिमित्त येणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी पिंपरीतील मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीला रॅम्प नाही. त्याचबरोबर लिफ्ट सुविधा नसल्याने वयोवृद्धांना दोन मजले पायºया चढून जाताना दमछाक होते. मूलभूत व आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने अपंग आणि वृद्धांची
प्रचंड गैरसोय न्यायालयाच्या आवारात होते.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोरवाडी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे. या ठिकाणी येणाºया पक्षकार, तसेच वकिलांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही ही वस्तुस्थिती आहे. वकिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या कक्षात जेमतेम १० ते १२ वकील बसू शकतात. महिला वकिलांसाठी असलेल्या कक्षात तर केवळ चार ते पाच महिला वकील बसू शकतील, एवढीच जागा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी न्यायालयीन कामकाजासाठी येणाºया अपंग व्यक्तींना पायºया चढून जाणे शक्य नाही. त्यांना रॅम्पची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध पक्षकारांना दोन मजले पायºया चढून जाणे जिकिरीचे ठरते. त्यांच्यासाठी लिफ्ट सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे.
गेल्या काही वर्षांत या सुविधा पुरविण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई केली जात नाही. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरली जात आहे. न्यायालयाचे प्रशासकीय व्यवस्थापन व पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशन यांच्या वतीने सुविधा मिळाव्यात यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून दुर्लक्ष झाल्याने सुविधांची पूर्तता होऊ शकलेली नाही.

Web Title: Lack of basic amenities like old age, disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.