अखेरची सलामी ६२ कोेटींची

By admin | Published: January 4, 2017 05:23 AM2017-01-04T05:23:56+5:302017-01-04T05:23:56+5:30

महापालिका निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जारी होऊ शकते, त्यामुळे विद्यमान सदस्यांच्या अधिकारातील स्थायी समिती सभेची आज शेवटची सभा होती.

The last opening is 62 coeti | अखेरची सलामी ६२ कोेटींची

अखेरची सलामी ६२ कोेटींची

Next

पिंपरी : महापालिका निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जारी होऊ शकते, त्यामुळे विद्यमान सदस्यांच्या अधिकारातील स्थायी समिती सभेची आज शेवटची सभा होती. सायंकाळी सातपर्यंत स्थायीची सभा सुरू होती. स्थायी सदस्यांचा आणि अधिकारी-ठेकेदारांचा विषय मंजूर करून घेण्यासाठी रात्रीस खेळ सुरूच होता. शेवटच्या सभेत एकूण ६३ कोटींचे १८३ विषय मंजूर झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता जारी होऊ शकते. त्यामुळे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने विकासकामांचा धडाका लावला आहे. सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीत अधिकाधिक विषय मंजूर करण्याचा धडाका लावला जात आहे. या पंचवार्षिकमधील विद्यमान सदस्यांची आजची शेवटची स्थायी समिती सभा होती. सभेची वेळ दुपारी अडीचची होती. मात्र, सायंकाळी पाच वाजेपर्यंत सभा सुरूच झाली नव्हती. तिसऱ्या मजल्यावरील स्थायी सभागृहात अधिकारी उपस्थित होते. मात्र, पदाधिकारी जागेवर नव्हते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बैठक सुरू झाली. विषयपत्रिकेवरील विषय अवघ्या काही मिनिटांत मंजूर केले. विषयपत्रिकेवर २१५ विषय होते. १४८ विषय मंजूर करण्यात आले. त्यामध्ये स्थापत्य, आरोग्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, उद्यान, झोपडपट्टी निर्मूलन, विद्युत विभागाचे विषय अधिक होते. तसेच अवलोकनाचेही विषय अधिक होते.(प्रतिनिधी)

- सुरुवातीला सभेत विषयपत्रिकेवरील १४८ विषय मंजूर करण्यात आले. हे विषय काही मिनिटांत मंजूर करण्यात आले. ऐन वेळचेही अनेक विषय होते. विषयपत्रिकेवरील विषय मंजूर झाल्यानंतर काही सदस्य बाहेर पडले. त्यानंतरही सभा सुरूच होती. तर काही सदस्य तीनही मजल्यांवरील विविध विभागांतून आपापले विषय आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. सहा वाजल्यानंतरही काही सदस्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत होते.

कार्यक्रमांकडे फिरविली पाठ
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन होते. मात्र, दुपारनंतर स्थायी समिती सभेच्या सदस्यांनी त्याकडे पाठ फिरविली. एकीकडे शहरात विविध विकासकामांची उद्घाटने होत असताना स्थायी सदस्य मात्र, अधिकाधिक विषय मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. सायंकाळी सातपर्यंत सदस्य महापालिका भवनात घुटमळत होते.

Web Title: The last opening is 62 coeti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.