रुग्ण हक्क स्वरक्षण कायदा हवा
By admin | Published: June 27, 2017 07:17 AM2017-06-27T07:17:02+5:302017-06-27T07:17:02+5:30
वैद्यकीय उपचार सेवेतील वाढते बाजारीकरण, खासगी दवाखान्यातील अनावश्यक आॅपरेशन, तपासण्या व महागडी औषधे कमीशनबाजी यातून रुग्णांची
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : वैद्यकीय उपचार सेवेतील वाढते बाजारीकरण, खासगी दवाखान्यातील अनावश्यक आॅपरेशन, तपासण्या व महागडी औषधे कमीशनबाजी यातून रुग्णांची व त्यांच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक पिळवणूक थांबण्यासाठी आणि डॉक्टरांवरील हल्ले रोखायचे असतील तर रुग्णांसाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा असणे गरजेचे आहे. यासाठी रुग्ण हक्कांना संरक्षण देणारा कायदा राज्यात होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जन आरोग्य अभियानाचे समन्वयक डॉ. अभिजित मोरे यांनी चिंचवड येथील आवाज रुग्णांचा या निर्धार जनजागृती मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी केले.
न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास शहरी आरोग्य विषयाचे अभ्यासक डॉ. किशोर खिल्लारे, जन आरोग्य अभियानाचे संयोजक डॉ. सुरेश बेरी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या कायदेशीर सल्लागार अॅड. मनीषा महाजन, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य नीलकंठेश्वर चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कृष्णाजी जगताप उपस्थित होते.
डॉ. मोेरे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात डॉक्टरांवर निर्घृण हल्ले झालेले आहेत. अशा घटनांच्या बिमोड होणे गरजेचे आहे. अशा घटना घडू नये, म्हणून फक्त सुरक्षारक्षक नेमून चालणार नाहीत.
डॉ. खिल्लारे यांनीदेखील सर्व प्रकारच्या तक्रारीच्या निवारणासाठी उपाययोजना आहेत. तशा प्रकारे रुग्णांच्या तक्रारीच्या निवारणासाठी देखील मेडिकल फोरम स्थापन करणे गरजेचे आहे.