गुंगीचे औषध देऊन वकील महिलेवर बलात्कार; विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढून दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 07:44 PM2022-02-27T19:44:24+5:302022-02-27T19:44:46+5:30

वकिलासह तिघांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Lawyer rapes woman by giving her drug Threatened to remove nude photos videos | गुंगीचे औषध देऊन वकील महिलेवर बलात्कार; विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढून दिली धमकी

गुंगीचे औषध देऊन वकील महिलेवर बलात्कार; विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढून दिली धमकी

googlenewsNext

पिंपरी : कामानिमित्त हॉटेलवर भेटायला बोलावून वकील महिलेला गुंगीकरक औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून विवस्त्र अवस्थेतील फोटो, व्हिडिओ काढले. याप्रकरणी वकिलासह तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी, शिवाजीनगर, वडगावशेरी, खराडी या भागात जून, जुलै २०१८ ते ३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

ॲड. अजय अप्पाराव साताळकर (वय ३९) आणि त्याची मैत्रीण असलेली एक वकील महिला तसेच एक महिला, अशा तीन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीडित ३८ वर्षीय महिलेने २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित फिर्यादी महिला वकील आहे. आरोपी अजय साताळकर हा देखील वकील असून, त्याने फिर्यादीसोबत ओळख वाढवून, मैत्री करून प्रेमाची मागणी केली. त्यासाठी फिर्यादीने नकार दिला.  

एसआरए (पुनर्वसन प्रकल्पाचे) मोठे काम मिळाले असल्याचे आरोपी साताळकरने फिर्यादीला सांगितले. पक्षकारांसोबत बोलणी करून काम समजून घेण्यासाठी फिर्यादीला पिंपरी येथील हॉटेलमध्ये बोलावले. तेथे आरोपी साताळकरने फिर्यादीला पाण्यातून गुंगीकारक औषध देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून फिर्यादीचे विवस्त्र फोटो व व्हिडिओ काढले. फिर्यादीसोबत लग्न करणार असल्याचे सांगून हा प्रकार कोणास न सांगण्याची आरोपीने धमकी दिली. पुन्हा भेटण्यासाठी आरोपीने संपर्क केला असता फिर्यादीने नकार दिला. त्यामुळे फिर्यादीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने फिर्यादीला विविध ठिकाणी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. 

आरोपी असलेली वकील महिला व आरोपी असलेली दुसरी महिला यांनी फिर्यादीस मारहाण व शिवीगाळ करून धमकी देऊन माफी मागण्यास सांगितले. त्याचा व्हिडिओ बनवून फिर्यादीचे विवस्त्र अवस्थेतील फोटो, व्हिडिओ तिच्या बहिणीच्या मोबाईलवर पाठवले. फिर्यादीच्या पतीला ते फोटो दाखवून फिर्यादीला त्रास दिला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.

Web Title: Lawyer rapes woman by giving her drug Threatened to remove nude photos videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.