प्राधिकरणाकडून घरांसाठी सोडत
By Admin | Published: May 11, 2017 04:39 AM2017-05-11T04:39:37+5:302017-05-11T04:39:37+5:30
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सदनिका व दुकाने यांच्या विक्रीकरिता अर्ज मागविले होते. एकूण १५८३ अर्जांची
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सदनिका व दुकाने यांच्या विक्रीकरिता अर्ज मागविले होते. एकूण १५८३ अर्जांची प्राथमिक छाननी केली असून, त्यानुसार पात्र व अपात्र अर्जदारांची आरक्षणनिहाय प्रारूप यादी प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
अर्जदारांनी या यादीचे अवलोकन करून या यादीबाबत हरकती असल्यास त्या दि. १२ मे रोजी सायंकाळी पावणेसहापर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गृहयोजना विभाग, दुसरा मजला, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या उपस्थितीत पुराव्यासह हरकती दाखल कराव्यात. प्राप्त हरकतींची तपासणी केली जाईल. हरकतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा असेल. अंतिम पात्र-अपात्र यादी १९ मेला जाहीर होणार आहे.
२३ मे रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे सोडत होणार आहे. तरी श्रीनाथ गृहसंकुल, थेरगाव, सेक्टर २० व सेक्टर २८ या लहान गटातील सर्व आरक्षणासाठी अर्ज दाखल केलेल्या पात्र अर्जदारांनी सकाळी नऊला, तर चिखली डिस्ट्रिक्ट सेंटर, पूर्णानगर येथील मोठ्या गटातील सर्व आरक्षणातील सदनिका व दुकानासाठी पात्र अर्जदारांनी दुपारी दोनला प्रा.मोरे सभागृह येथे उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.